शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली उधळपट्टी

By admin | Updated: January 4, 2016 02:44 IST

मीरा-भाईंदर महापालिकेत सर्वच्या सर्व ९८ नगरसेवकांसह सुमारे पाच अधिकारी-कर्मचारी येत्या फेब्रुवारीत म्हैसूरला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेत सर्वच्या सर्व ९८ नगरसेवकांसह सुमारे पाच अधिकारी-कर्मचारी येत्या फेब्रुवारीत म्हैसूरला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने एमएमआरडीएने विकासकामांसाठी कर्ज देण्यास नकार दिला तर दुसरीकडे साधारण ६० लाखांचा खर्च करुन या अभ्यास दौऱ्याचा घाट घातला जात आहे. शहरातील नागरिक पाणीटंचाई, कचरा, डास, खराब व अतिक्रमित रस्ते-फुटपाथ आदी समस्यांनी त्रस्त असताना गेल्या काही महिन्यांपासून म्हैसूर व उटी येथे अभ्यास दौरा काढण्याची धावपळ सुरु झाली आहे. त्यासाठी तीन वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु, एकच निविदा प्राप्त झाल्याने श्रीनिशी एंटरप्रायझेसला दौऱ्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ठेकेदाराने प्रतिव्यक्ती ७४ हजार रु पये इतका खर्च निविदेत दिला होता. परंतु, खर्च वाढेल म्हणून उटीला जाणे रद्द करून वाटाघाटीत ६० हजार रुपये प्रतिव्यक्ती दर आयुक्तांनी निश्चित केला. चार रात्री व पाच दिवसांचा हा दौरा असून हवाईमार्गे बंगळुरू व तेथून म्हैसूर असा प्रवास असेल. मीरा-भार्इंदर महापालिकेचे सध्या निवडून आलेले ९३ तर स्वीकृत पाच असे ९८ नगरसेवक आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांचा अभ्यास दौरा काढण्याची मागणी नगरसेवकांमधून सातत्याने होत होती. महापौर गीता जैन यांनीदेखील त्यास होकार दर्शवला होता. नोव्हेंबरमध्ये महिला बालकल्याण समितीच्या व वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांची मुदत संपलेली असतानाही त्यांचे अभ्यास दौरे घडले. महिला बालकल्याणच्या माजी सदस्यांनी सुमारे सहा लाख खर्चून त्रिवेंद्रम व कन्याकुमारी येथे तर वृक्ष प्राधिकरणच्या माजी सदस्यांनी सुमारे १० लाख खर्चून देहरादून, सिमला आदी पर्यटनस्थळी अभ्यास दौरा केला होता.