शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक भारतीय नागरिकाला हवी संविधानाची माहिती

By admin | Updated: November 30, 2015 02:28 IST

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना विविधतेतही एकता जपणारा ग्रंथ म्हणजेच भारतीय संविधान आणि या देशाचा एक नागरिक म्हणून प्रत्येकाला या संविधानाची माहिती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. संविधानाचे महत्त्व व नागरिकांची जबाबदारी याविषयी उपस्थितांशी डॉ. जाधव यांनी संवाद साधला.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंभिरा सामाजिक संस्थेच्या सहयोगाने संविधान दिनानिमित्त २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातील दुर्मीळ छायाचित्रांच्या तसेच विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रव्यवहाराची छायाचित्रे आणि त्यांनी वापरलेल्या साहित्याची छायाचित्रे याच्या प्रदर्शनाला तीन दिवसांत हजारो नागरिकांनी भेट दिली असून, डॉ. नरेंद्र जाधव यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन या अभिनव उपक्र माचे कौतुक केले. डॉ. नरेंद्र जाधव यांचे बोधप्रद विचार ऐकण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांनी म्हटल्याप्रमाणे दर्दींची उदंड गर्दी होती. आपले संविधान, आपला आत्मसन्मान ही भूमिका विशद करताना नागरिकांना संविधानामुळे प्राप्त झालेल्या अधिकारांबरोबरच आपल्या सम्यक कर्तव्याची जाणीव होणे गरजेचे आहे. याकरिता दहावीपर्यंत अभ्यासक्र मात नागरिकशास्त्र हा विषय अनिवार्य करण्यात यावा आणि त्यामध्ये ५० टक्के भाग संविधानावर आधारित असावा, असे मत मांडत नरेंद्र जाधव यांनी संविधानाचे महत्त्व जनमानसात प्रसारित होण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने हा विशेष कार्यक्र म आयोजित करून घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक केले.सुजाण नागरिक म्हणवून घेण्यासाठी भारतीय संविधानाची किमान माहिती प्रत्येकाला असायला हवी, असे सांगत उद्देशिका अर्थात सरनामा हा भारतीय संविधानाचा आत्मा असून, कमीत कमी शब्दांत प्रभावी आशय मांडणारी उद्देशिका सर्वोत्तम प्रभावी रचना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता जयवंत सुतार आदी उपस्थित होते.