शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या उद्यानाचे अखेर लोकार्पण

By admin | Updated: March 23, 2017 01:41 IST

नवीन पनवेल सेक्टर १६ मधील सिडकोच्या उद्यानात चाय पे चर्चासाठी आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी २२ मार्च

पनवेल : नवीन पनवेल सेक्टर १६ मधील सिडकोच्या उद्यानात चाय पे चर्चासाठी आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी २२ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता उद्घाटन करून नागरिकांसाठी खुले करीत असल्याचे जाहीर केले. या वेळी उपस्थित प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी या उद्यानाला नानासाहेब धर्माधिकारी उद्यान असे नाव देण्याची मागणी आमदारांकडे केली.नवीन पनवेलमधील सेक्टर १६ मध्ये सात ते आठ एकरमध्ये सिडकोने उद्यान बांधले आहे. दोन वर्षे मुदतीच्या कामाला सहा वर्षे मुदतवाढ मिळूनही काम पूर्ण असताना अर्धवट सांगून मुदतवाढ देऊन ठेकेदाराला बजेट वाढवून दिले जात होते. या उद्यानात क्रि केट, हॉलीबॉल, स्केटिंगची मैदाने आहेत. विरंगुळा केंद्र, नाना-नानी पार्क, योग करण्याची सोय आहे. हे सर्व तयार असताना मुलांना मैदान वापरू दिले जात नाही. सिडको जाणूनबुजून त्याचे उद्घाटन करीत नाही अशी तक्र ार आमदारांजवळ प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ व त्याठिकाणी सकाळी फिरायला आलेल्या नागरिकांनी केली. या वेळी वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्षा चारु शीला घरत, प्रशांत फुलपगारे आदी उपस्थित होते.आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकांच्या मागणीवरून उद्यानात जाऊन पाहणी केली. त्यानंतर श्रीफळ वाढवून उद्यानाचे उद्घाटन करून सर्वांना खुले केल्याचे जाहीर केले. या वेळी प्रकल्पग्रस्त परांडवाल, भुजबळ, लोंढे, कांडपिळे, मोरे व ग्रामस्थ कानडे, सपकाळ, शिंदे, अरुण रावते आदींनी या उद्यानाला महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी नाव देण्याची मागणी केली. आमदारांनी त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांना दिले. (वार्ताहर)