शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या सेवेत येणार इलेक्ट्रीक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:29 IST

एनएमएमटीच्या ताफ्यात लवकरच ३० नव्या इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्याकरिता शुक्रवारी झालेल्या बैठकीत अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी दिली.

नवी मुंबई - एनएमएमटीच्या ताफ्यात लवकरच ३० नव्या इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. त्याकरिता शुक्रवारी झालेल्या बैठकीत अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी दिली. याकरिता शासनाच्या फेम योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त होणार आहे.नवी मुंबई महानगर पालिकेची परिवहन सेवा तोट्यात चालत असली, तरीही प्रवाशांच्या सोयीसाठी सतत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यानुसार आगामी काळात एनएमएमटीच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल करून घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याकरिता अवजड व सार्वजनिक उद्योग खात्याकडे प्रस्ताव मांडला असता, त्यास हिरवा कंदील मिळाल्याची माहिती परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात सदर खात्याकडे हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु सद्यस्थितीला मोठ्या शहरांनाच इलेक्ट्रीक बस देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. परंतु मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांच्या स्पर्धेत नवी मुंबई असल्याने शहरातील दळणवळण व्यवस्थाही अद्ययावत होत आहे. त्यानुसार एनएमएमटी प्रशासनाने त्यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचा अहवाल सादर करून तो ६ जुलै रोजी झालेल्या बैठकीत मांडला होता. या सादरीकरणातील मुद्द्यांच्या आधारे अवजड व सार्वजनिक उद्योग केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी एनएमएमटीला ३० इलेक्ट्रीक बस देण्यास हिरवा कंदील दाखवल्याचे परिवहन सभापती प्रदीप गवस यांनी सांगितले. केंद्राच्या फेम योजनेअंतर्गत अनुदानातून या बस मिळणार आहेत. त्यानुसार आगामी काळात एनएमएमटीच्या ताफ्यात नव्या ३० इलेक्ट्रीक बस दाखल होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :newsबातम्याNavi Mumbaiनवी मुंबई