शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सानपाडा शाळेविषयी महापालिकेचा दुजाभाव

By admin | Updated: September 12, 2015 23:26 IST

सानपाडामध्ये महापालिकेने सन २०१० मध्ये नवीन ईमारत बांधली. परंतु पाच वर्ष झाल्यानंतरही त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही. शाळेच्या वाढीव मजल्यासाठीची निविदा

नवी मुंबई : सानपाडामध्ये महापालिकेने सन २०१० मध्ये नवीन ईमारत बांधली. परंतु पाच वर्ष झाल्यानंतरही त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही. शाळेच्या वाढीव मजल्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला जात नाही. पालिका जाणीवपूर्वक दुजाभाव करीत असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळाही पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या. या शाळांच्या इमारती मोडकळीस आल्यामुळे प्रशासनाने स्कूल व्हिजनच्या माध्यमातून नवीन ईमारतींचे बांधकाम केले आहे. यामध्ये सानपाडामधील शाळा क्रमांक १८ व १९ चाही समावेश आहे. श्री दत्तविद्यामंदिर नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम २०१० मध्ये पुर्ण झाले. या इमारतीमध्ये सद्यस्थितीमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरत आहेत. प्राथमीकमध्ये ८०० तर माध्यमीकमध्ये १३६ विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थी संख्या वाढत असल्यामुळे शाळेतील ईमारत कमी पडू लागली आहे. प्रयोग शाळा, ग्रंथालय व इतर गोष्टींसाठी जागा नसल्यामुळे एक मजला वाढविण्यासाठी पालिकेने निवीदा मागविल्या होत्या. दोन वेळा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिसऱ्यांदा निवीदा मागविल्या. आता या प्रस्तावास स्थायी समितीची परवानगी आवश्यक आहे. परंतू पाठपुरावा करूनही हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणला जात नाही. स्थानीक नगरसेवीका कोमल वास्कर यांनी गत आठवड्यातील स्थायी समितीमध्ये प्रस्ताव मंजूरीसाठी आणला जात नसल्याविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की सानपाडा शाळेविषयी नेहमीच दुजाभाव केला गेला आहे. पाच वर्षात ९ पत्र देवूनही अद्याप शाळेचे उद्घाटन केलेले नाही. उद्घाटन न करताच शाळा सुरू आहे. आता वाढीव मजल्याचे कामही मंजूर केले जात नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा प्रस्ताव लवकर मंजूर करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.