शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल परिसरातील डॉक्टरांचे ‘काम बंद’ आंदोलन

By admin | Updated: March 16, 2017 03:03 IST

धुळे येथील शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांनी जबर मारहाण केली. यात सदर डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.

पनवेल : धुळे येथील शासकीय रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांनी जबर मारहाण केली. यात सदर डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद वैद्यकीय क्षेत्रात उमटले आहेत. पनवेल परिसरातील डॉक्टर्सनी बुधवारी आपली रुग्णालये, दवाखाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. अशा घटनांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना आखाव्यात. तसेच डॉक्टर्सना सरंक्षण द्यावे, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या. पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यात पनवेलसह खारघर, कामोठे, कळंबोली परिसरातील पाचशेपेक्षा अधिक डॉक्टर्स सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, ‘काम बंद’ आंदोलनात दवाखाने बंद ठेवण्यात आले असले, तरी अत्यावश्यक सेवा आणि रुग्णालयाचा कारभार नियमितपणे सुरू होता. त्यामुळे या बंदचा रुग्णांवर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मागील काही महिन्यांपासून रुग्णांच्या नातेवाइकांडून डॉक्टर्सवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे डॉक्टर्सचे खच्चीकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर असे प्रकार थांबविण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत. तसेच डॉक्टर्सना संरक्षण द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करतात. मात्र, अनेकदा त्यांना यश येत नाही. एखादी दुर्दैवी घटना घडते. अशा वेळी संबंधित डॉक्टरला जबाबदार धरणे योग्य नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व डॉक्टर असोसिएशनचे सदस्य रमेश पटेल यांनी या वेळी स्पष्ट केले. पनवेल डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अनिल परमार, डॉ. गिरीश गुणे, डॉ. नितीन तांबे आदींसह मोठ्या प्रमाणात पनवेल परिसरातील डॉक्टर्सनी या ‘काम बंद’ आंदोलनात सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)