शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी बंदराच्या अध्यक्षपदी दिघीकर

By admin | Updated: August 27, 2015 23:55 IST

जेएनपीटीच्या अध्यक्षपदी अनिल दिघीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. दिघीकर हे जेएनपीटीचे १६ वे अध्यक्ष म्हणून

उरण : जेएनपीटीच्या अध्यक्षपदी अनिल दिघीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ सप्टेंबरपासून ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. दिघीकर हे जेएनपीटीचे १६ वे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर अरुण बोंगिरवार यांच्यानंतर जेएनपीटीच्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत दिघीकर हे दुसरे मराठी अध्यक्ष ठरणार आहेत. जेएनपीटी बंदराची स्थापना २६ मे १९८९ रोजी झाली. तेव्हापासून जानेवारी २००१ ते २००२ या दरम्यानचा एकमेव कालखंड वगळता २६ वर्षांच्या कालखंडात जेएनपीटी बंदराच्या अध्यक्षपदाची सूत्रे केंद्राने सातत्याने अमराठी माणसांच्याच हाती सोपविली आहेत. अरुण बोंगिरवार यांनी अध्यक्षपदाची धुरा २९ जानेवारी २००१ ते १७ आॅक्टोबर २००२ दरम्यान फक्त २२ महिनेच सांभाळली आहे. बोंगिरवार यांचा अपवाद वगळता केंद्राला जेएनपीटीच्या अध्यक्षपदासाठी २६ वर्षात मराठी माणसाची नियुक्तीच झालेली नाही. फेबु्रवारी २०१५ पर्यंत जेएनपीटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार एन.कुमार यांच्याकडे होता. तेव्हापासून जेएनपीटीचे अध्यक्षपद रिक्त होते. दरम्यानच्या काळात जेएनपीटीचा कारभार उपाध्यक्ष नीरज बन्सल हे सांभाळत होते. केंद्रातील सत्तांतरानंतर नौकानयन विभागाचे मंत्रिपद नितीन गडकरी यांच्याकडे सोपविले आहे. त्यांनी सूत्रे हाती घेताच वर्षभरात जेएनपीटीच्या अध्यक्षपदी अनिल दिघीकर यांनी नियुक्ती केली आहे. दिघीकर सध्या एमएसआरडीसीच्या महाव्यवस्थापकपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. (वार्ताहर)