शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

तोतया जामीनदारांच्या टोळीला अटक

By admin | Updated: July 8, 2017 06:02 IST

: बनावट कागदपत्रांआधारे गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळवून देणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बनावट कागदपत्रांआधारे गुन्हेगारांना न्यायालयातून जामीन मिळवून देणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट शिधावाटप पत्रिका, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयांत बनावट जामीनदार उभे करून गुन्हेगारांना सोडवणारी टोळी शहरात सक्रिय होती. त्यापैकी काहींची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सतीश सरफरे यांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक अमित शेलार, संजय पवार, हवालदार प्रदीप कदम, पोलीस नाईक दिलीप भस्करे, अनिल यादव, विजय पाटील यांचे पथक तयार करून बनावट सापळा रचला. ग्राहकाला बनावट जामीनदार व कागदपत्रे पुरवण्यासाठी तिघे जण दिघा गावात आले असता छापा टाकून कारवाई करण्यात आली. या वेळी मधुकर बाविस्कर (४७), श्रीराम बिंद (४४) व जिलेदार शर्मा (५१), अशी त्यांची नावे आहेत. तिघेही ठाणे, कल्याण व मुंबई परिसरातले राहणारे आहेत. झडतीमध्ये त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका, निवडणूक ओळखपत्र, बनावट टॅक्स पावत्या यांसह शासकीय कार्यालयांचे रबरी शिक्के, शिधावाटप पत्रिकेचे कोरे छापील कागद, असा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने मुंबई व ठाणे न्यायालयातून अनेक गुन्हेगारांना बनावट जामीनदारांमार्फत जामीन मिळवून दिलेला असल्याचे सहआयुक्त प्रशांत बुरडे यांनी सांगितले. तर या टोळीत इतरही काहींचा सहभाग असून, त्यांचाही शोध गुन्हे शाखा करत असल्याचे त्यांनी सांगितले.