शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या टाक्यांमुळे डेंग्यूचा फैलाव

By admin | Updated: November 10, 2015 01:24 IST

शहरात जुलैपासून तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होवू लागली आहे. डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रूग्णांची संख्याही वाढली आहे.

नवी मुंबई : शहरात जुलैपासून तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होवू लागली आहे. डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रूग्णांची संख्याही वाढली आहे. इमारतींवरील पाण्याच्या उघड्या टाक्या, भंगार साहित्य व इतर ठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिक स्वत: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असून त्याचे खापर आरोग्य विभाग व नगरसेवकांवर फोडले जात आहे.नवी मुंबईमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. पालिकेची माता बाल रूग्णालये बंद होवू लागली आहेत. नागरी आरोग्य केंद्रामधून प्रभावीपणे काम होत नाही. पूर्ण भार वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयावर पडू लागला आहे. योग्य उपचार मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जुलै महिन्यापासून शहरात तापाची साथ सुरू झाली असून डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रूग्णांची संख्याही वाढली आहे. बंद रूग्णालय, फसलेला सुपरस्पेशॅलिटीचा प्रयोग व नवीन रूग्णालय सुरू होण्यास लागणारा विलंब याचा सर्व राग नागरिक व लोकप्रतिनिधींनी डेंग्यू व मलेरिया नियंत्रण विभागावर काढण्यास सुरवात केली आहे. आरोग्य विभागाने डेंग्यू व मलेरियाचा फैलाव होवू नये यासाठी व्यापक जनजागृती सुरू केली आहे. पथनाट्य, आरोग्य शिबिर, माहितीपत्रकांच्या माध्यमातूनही जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. टेरेसवर भंगार साहित्य व इतर वस्तू ठेवू नये याविषयी आवाहन करूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. शहरामधील ७० टक्के इमारतींवरील पाणी साठविण्याच्या टाक्यांवर झाकणच नसते. झाकण नसल्यामुळे पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होवू लागली आहे. अनेक इमारतींवर असलेल्या साहित्यामध्येही पाणी साचत आहे. अनेक नागरिकांच्या घरामध्ये असणाऱ्या साठवण टाक्याही वेळोवेळी साफ केल्या जात नाहीत. याविषयी मनपा जनजागृती करत असूनही नागरिक योग्य काळजी घेत नाहीत. नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली नाही तर महापालिकेने कितीही काळजी घेतली तरी साथ आटोक्यात येवू शकत नाही. वाशीमधील शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनीही आरोग्याच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या समस्येकडे लक्ष वेधले होते. पाण्याच्या टाक्या उघड्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा फैलाव होत आहे. नागरिकांनी टाक्या बंदिस्त कराव्या व जे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी असे मत व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)