शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

शाळांबाहेरच्या टपऱ्या हटवण्याची मागणी

By admin | Updated: November 17, 2016 06:21 IST

विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून टाळण्याकरिता शाळांच्या आवारातील टपऱ्या हटवण्याची मागणी पुढे येवू लागली आहे.

नवी मुंबई : विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून टाळण्याकरिता शाळांच्या आवारातील टपऱ्या हटवण्याची मागणी पुढे येवू लागली आहे. अशा टपऱ्यांवर सिगारेट, गुटखा याशिवाय अमली पदार्थांची विक्री होत असल्यामुळे शाळकरी मुले नशेच्या आहारी जात आहेत. शहरात अनेक ठिकाणी शाळांच्या लगतच टपऱ्यांवर सिगारेट, मावा तसेच गुटखा व इतर नशेच्या पदार्थांची विक्री होत असल्याचे पहायला मिळत आहे. शाळेपासून किमान १०० मीटरपर्यंत अशा अमली पदार्थांच्या विक्री व वापरावर बंदी असतानाही नियमांची पायमल्ली होताना पहायला मिळत आहे. शाळेच्या आवारातच सहज उपलब्ध होणाऱ्या या नशेच्या पदार्थांकडे विद्यार्थी एकमेकांच्या संगतीने आहारी जात आहेत. यामुळे बालगुन्हेगारी वाढत आहे. शाळांपासून ठरावीक अंतरावर सिगारेट अथवा इतर कोणत्याच नशेच्या पदार्थांची विक्री होवू नये अशी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी संघटनेची मागणी आहे. याकरिता त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी प्रशासन पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांची भेट घेवून निवेदन दिले. याप्रसंगी नगरसेवक मुनावर पटेल, जयंत हुद्दार, ऐरोली विधानसभा युवक अध्यक्ष राजेश मढवी, विद्यार्थी अध्यक्ष राहुल शिंदे, हरेश भोईर, प्रशांत आचार्या आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेत शाळांभोवती पोलिसांची गस्त वाढवून नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपआयुक्त पवार यांनी दिले. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी प्रत्येक शाळेसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. स्कूल बस व्यतिरिक्त खाजगी वाहनांमधून देखील अनेक विद्यार्थी येत असल्याने त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. परंतु जर ठरावीक वेळेकरिता शाळा व्यवस्थापनाने शाळेलगतचे मैदान पालकांच्या वाहनांसाठी खुले करावे, अशी मागणी राहुल शिंदे यांनी मांडली. (प्रतिनिधी)