शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: September 3, 2015 03:03 IST

घणसोली येथील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. सचिन झा (२०) असे त्याचे नाव आहे. नेमलेला सुरक्षारक्षक तलावाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने काही जण तलावात

नवी मुंबई : घणसोली येथील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. सचिन झा (२०) असे त्याचे नाव आहे. नेमलेला सुरक्षारक्षक तलावाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने काही जण तलावात पोहत असताना ही दुर्घटना घडली. यामुळे तलावाच्या ठिकाणच्या सुरक्षारक्षकांना वेगळ्या कामात जुंपणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.घणसोली गावातील आनंदनगर येथे राहणाऱ्या सचिन झा याचा गुणाली तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मित्रांसोबत तो तलावामध्ये पोहण्यासाठी उतरला असता खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. शहरातील तलावांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गत पंचवार्षिक कालखंडात लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्य व्यक्त करत तलावांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली होती. याबाबत सतत स्थायी समिती व महासभेत चर्चाही घडल्या होत्या. त्यानंतर तलावांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. परंतु त्यातही नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. काही तलावांच्या ठिकाणी तीनपेक्षा जास्त, तर काही ठिकाणी अवघा एकच सुरक्षारक्षक कार्यरत आहे. तलावात कोणी पोहण्यासाठी उतरू नये, कपडे धुऊ नये किंवा घाण करू नये यासाठी हे सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. तलावांच्या ठिकाणी नेमलेल्या या सुरक्षारक्षकांच्या भीतीमुळे त्या ठिकाणचे अनेक गैरप्रकारही टळले आहेत. परंतु काही ठिकाणी या सुरक्षारक्षकांना अधिकारी वेगळ्या कामात गुंतवत असल्याचेही दिसून येत आहे. विभाग कार्यालयातील अथवा प्रभागातील छोट्या - मोठ्या कामांची जबाबदारीही या तलावाच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकांवर ढकलली जात आहे. (प्रतिनिधी)