शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महापे रस्त्यावर डंपरच्या धडकेने मुलाचा मृत्यू

By admin | Updated: November 10, 2015 01:20 IST

तुर्भे - महापे रोडवर इंदिरानगरजवळ रविवारी सकाळी डंपरच्या धडकेने साहिल अशोक वैरागे (९) या मुलाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : तुर्भे - महापे रोडवर इंदिरानगरजवळ रविवारी सकाळी डंपरच्या धडकेने साहिल अशोक वैरागे (९) या मुलाचा मृत्यू झाला आहे. याविषयी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी चालकास अटक केली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. औद्योगिक वसाहतीमधून तुर्भे - महापे रोड जात असल्यामुळे दिवस - रात्री या परिसरात अवजड वाहनांची वर्दळ असते. इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये जवळपास वीस हजार लोकवस्ती आहे. नागरिकांना कामनिमित्त तुर्भे नाका व इतर ठिकाणी वारंवार जावे लागते. रोज हजारो नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो. रविवारी सकाळी रस्ता ओलांडत असणाऱ्या साहिल वैरागे याला डंपरने धडक दिली. या धडकेमध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. या परिसरात अशाप्रकारे वारंवार अपघात होवू लागले असून वर्षभरामध्ये जवळपास तिघांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या साहीलचे वडील बिगारी काम करत असून आई घरकाम करत आहे. मुलाच्या अचानक मृत्यूमुळे त्यांनाही धक्का बसला आहे. इंदिरानगर व बगाडे परिसरातील नागरिकांनी या रोडवर स्पीड बे्रकर बसविण्याची मागणी अनेक वेळा केली आहे. शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनीही वारंवार पत्रव्यवहार केला आहे. परंतु पालिका प्रशासनाने या समस्येकडे दुर्र्लक्ष केले असल्यामुळेच अपघात होवू लागले आहेत. (प्रतिनिधी)