दि. बा.पाटील यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्रभूषण’ देण्याची मागणी

By Admin | Updated: July 17, 2017 01:25 IST2017-07-17T01:25:43+5:302017-07-17T01:25:43+5:30

दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती.

D Demand for giving posthumously 'Maharashtra Bhushan' to Bab. Patil | दि. बा.पाटील यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्रभूषण’ देण्याची मागणी

दि. बा.पाटील यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्रभूषण’ देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर येणाऱ्या सभेत चर्चा करून राज्य शासनाला शिफारस करण्यात येणार असल्याची ग्वाही महापौर डॉ. चौतमोल यांनी दिली.
शुक्र वारी संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापौर चौतमोल यांची महापालिकेत भेट घेतली. महापालिकेने दिबांच्या नावाने सामाजिक स्तरावर पुरस्कार द्यावा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती घोषित करावी, महापालिका क्षेत्रात दिबांचा पुतळा उभारण्यात यावा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Web Title: D Demand for giving posthumously 'Maharashtra Bhushan' to Bab. Patil