शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीला विष देणाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:05 IST

शहरातील समीर लॉजमध्ये प्रेयसी व प्रियकराने २ वर्षांच्या मुलीसह विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

पनवेल : शहरातील समीर लॉजमध्ये प्रेयसी व प्रियकराने २ वर्षांच्या मुलीसह विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात चिमुकलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी लिजी कुरीयन व वाशिम अब्दुल कादीर या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पनवेलमध्ये ९ नोव्हेंबर रोजी समीर लॉज या ठिकाणी विष प्राशन केल्याने जोहाना या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान लिजीने प्रियकर वाशिम अब्दुल कादीर यांच्या मदतीने पती रिजोश याचा केरळ येथे खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात शंतपारा पोलीस स्टेशन, ईडुक्की, केरळ येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लिजी कुरीयन व वाशिम अब्दुल कादीर या दोघांनी रिजोशची हत्या केली. त्यानंतर ते दोघे मुंबई, पनवेल येथे पळून आले. लिजी कुरीयन व वासिम अब्दुल कादीर यांनी विषारी औषध देऊन जोवाना हिला मारले. रिजोशच्या खुनाच्या गुन्ह्यात त्यांना अटक होऊ नये म्हणून त्यांनी स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानुसार १० नोव्हेंबर रोजी रिजोश याचे भाऊ आणि जोहाना हिचे चुलते जिजोश विन्सेंन्ट यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येऊन मुलगी जोवाना हिची ओळख पटवली.जोहाना हिला विषारी औषध पाजून ठार मारल्याबद्दल तिची आई लिजी कुरीयन व वासिम अब्दुल कादीर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. जोहाना हिचा मृतदेह अंत्यविधीसाठी जिजोश यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गुन्ह्यातील विष प्राशन केलेल्या दोन्ही आरोपींवर जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून ते अद्याप जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.