शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

मतदानादिवशीच नेरूळमध्ये मतमोजणी

By admin | Updated: January 7, 2016 00:58 IST

नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी १० जानेवारीला मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणीही केली जाणार आहे

नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी १० जानेवारीला मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणीही केली जाणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, नेते व प्रमुख पदाधिकारी प्रभागात ठाण मांडून बसले आहेत. या पोटनिवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिल्पा कांबळे यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या प्रचारासाठी स्वत: गणेश नाईक, संजीव नाईक, महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रचारसभा घेतल्या आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देण्यात आला आहे. माजी नगरसेवक सुरेश शेट्टी स्वत: प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहेत. काँगे्रसने यावेळी पुन्हा नूतन दिगंबर राऊत यांना उमेदवारी दिली आहे. मागील वेळी थोडक्यात पराभव झाल्यामुळे काँगे्रसने कोणत्याही स्थितीमध्ये विजय मिळवायचा, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, संतोष शेट्टी व पक्षाचे इतर अनेक पदाधिकारी प्रभागात प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी व युतीच्या नेत्यांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरू असताना काँग्रेसने मात्र प्रत्येक घरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. भारतीय जनता पक्षाने सरस्वती पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना व भाजपाची युतीच्या नेत्यांनीही सभा घेऊन परिवर्तनाचे आवाहन केले आहे. आमदार मंदा म्हात्रे या स्वत: मतदारांशी संवाद साधत आहेत. सरकारने एक वर्षामध्ये कशाप्रकारे जनहिताची कामे मार्गी लावली. नवी मुंबईतील सोडविलेले प्रलंबित प्रश्न, याविषयी माहीती दिली जात आहे. प्रचारादरम्यान आता तिन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका सुरू केली आहे. १० जानेवारीला मतदान होणार आहे. यापूर्वी ११ तारखेला मतमोजणी होणार होती, परंतु निवडणूक विभागाने ६ जानेवारीला अधिसूचना काढून मतदानादिवशीच मतमोजणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सेंट झेव्हियर्स शाळेमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)