Coronavirus : महापौरांच्या आवाहनाला विरोधकांचा प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 07:26 PM2020-04-07T19:26:47+5:302020-04-07T19:32:01+5:30

Coronavirus : पनवेल महानगर क्षेत्रात देखील कोरोनाचे 17 रुग्ण आढळले असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

Coronavirus Opponents' response to the mayor in panvel municipal corporation SSS | Coronavirus : महापौरांच्या आवाहनाला विरोधकांचा प्रतिसाद 

Coronavirus : महापौरांच्या आवाहनाला विरोधकांचा प्रतिसाद 

Next

वैभव गायकर 

पनवेल - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. पनवेल महानगर क्षेत्रात देखील कोरोनाचे 17 रुग्ण आढळले असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यामध्ये अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी आदींसह सर्व यंत्रणेचा समावेश आहे. पालिकेला सहाय्य करण्याच्या दृष्टीने महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी नागरिकांना महापौर सहाय्यता निधी मध्ये मदतीचे अवाहन केले होते. या अहवानाला पनवेल महानगर पालिकेतील विरोधकांनी प्रतिसाद दिला असून 29 नगरसेवकांनी आपले एका महिन्याचे मानधन महापौर सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पनवेल महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी मंगळवारी आयुक्त गणेश देशमुख यांना यासंदर्भात पत्र देऊन शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या 29 नगरसेवकांचे प्रत्येकी 10 हजाराचे मानधन महापौर सहायता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे.29 नगरसेवकांचे प्रत्येकी  म्हणजे 2 लाख 90 हजार रक्कम महापौर निधीत जमा होणार आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अवाहनाला विरोधीपक्षाने सर्वप्रथम प्रतिसाद दिल्याने हे देखील कौतुकास्पद आहे. 

विरोधीपक्ष नेते म्हात्रे यांनी सांगितले की, सध्याच्या घडीला देशभरात आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपले योगदान आहे. महापौरांच्या आवाहनानंतर मी स्वतः सर्व नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चा केली. य सर्व नगरसेवकांनी त्वरित आपले मानधन महापौर सहाय्यता निधीत जमा करण्यास तयारी दर्शविली. यानंतर मी यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र देऊन आम्ही देखील प्रशासनासोबत असल्याचे त्यांना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येईल, लोकांचे जीव गेले तर ते परत कसे आणणार?'

Coronavirus : 'घरचे आजारी पडले तर...', कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले

Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 833 जणांचा मृत्यू

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी

Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा

 

Web Title: Coronavirus Opponents' response to the mayor in panvel municipal corporation SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.