शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान मोठे; माफीनामा लिहून दिला तरच सुटका ​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 1:01 AM

घणसोलीतील स्वातंत्र्य संग्राम चौकाचे २० मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

अनंत पाटीलनवी मुंबई : ब्रिटिश राजवटीत ठाणे जिल्हा साष्टी तालुक्याचा भाग म्हणून संबोधला जात असे. आताच्या ठाणे शहराच्या पूर्वेस खाडी किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला असून त्या किल्ल्याचे रुपांतर आता ठाणे तुरुंगात झाले आहे. याच तुरुंगात ब्रिटिश सरकारने ज्वलंत क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली होती. असंख्य देशभक्तांना लोखंडी गजाआड डांबून ठेवले म्हणून हे ठाण्याचे कारागृह स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाचे होते. घणसोली गावात स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देणारी “स्वातंत्र्यसंग्राम चौक” वास्तू आहे.

महादेव काळदाते,डॉ.देसाई,दत्तू वाळक्या, वाल्मिक कोतवाल,वकील दामले यांच्या नेतृत्वाखाली ३० जानेवारी १९३० रोजी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली. यात घणसोली येथील बामा म्हात्रे, सोमा कोळी, फकीर पाटील, राघो पाटील, कमला म्हात्रे, जोमा मढवी, पांडुरंग बोंद्रे, शंकरबुबा पाटील, रामा रानकर, वामन पाटील, सीताराम बामा, रघुनाथ पवार,नारायण मढवी, चाहु पाटील, हाल्या म्हात्रे, महादू पाटील, वाल्मिक पाटील, वाळक्या पाटील परशुराम  पाटील आदींनी मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. १३ एप्रिल १९३० रोजी सानपाडा येथील सोनखाडीतून मीठ घेऊन घोषणा देत सत्याग्रही ठाण्याच्या दिशेने जात असताना बोनकोडे येथे पोलिसांनी लाठीमार केला. त्यात गोठीवली गावच्या कान्हा म्हात्रे यांच्या पायाला दुखापत झाल्याने अपंगत्व आले. त्याच कालावधीत दिघा, ऐरोली, दिवा, रबा‌ळे, तळवली, गोठीवली, घणसोली, कोपरखैरणे, बेलापूरपर्यंत  बैठका घेऊन जनजागृती केली. १९४२ पर्यंत या सत्याग्रहींनी ब्रिटिशांची रेल्वे सेवा बंद होण्यासाठी रूळ काढण्याचे प्रकार केले, विजेचे खांब तोडणे,टेलिफोनच्या तारा कापून टाकणे याकामी जनजागृती केली. घणसोलीतील स्वातंत्र्य संग्राम चौकाचे २० मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

माफीनामा लिहून दिला तरच सुटका १ जानेवारी १९३१ रोजी विलेपार्ले येथील परिषदेत घणसोली छावणीत सत्याग्रहींनी स्वयंसेवक म्हणून काम केले. तेव्हा त्यांना पकडून अंधेरीच्या तुरुंगात डांबले. १६ फेब्रुवारी १९३२ मध्ये घणसोली गावात तिरंगा हातात घेऊन घोषणा दिल्याने ब्रिटिशांनी अनेकांना अटक करून ठाण्याच्या तुरुंगात टाकले. प्रत्येकाच्या घरातील भांडीकुंडी जप्त करून माफीनामा लिहून दिला तरच सुटका होण्याचे फर्मान काढले. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन