शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत मतदार याद्यांमध्ये घोळ; अनेकांची नावे गायब, एकाच नंबरवर दोघांची नावे

By नामदेव मोरे | Updated: May 16, 2024 19:19 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबईमधील ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४ लाख ३९ हजार व बेलापूर मतदारसंघात ३ लाख ७९ हजार मतदारांचा समावेश आहे.

नवी मुंबई : मतदान चार दिवसांवर आले असतानाही मतदार याद्यांमधील घोळ अद्याप संपलेला नाही. अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत. एकाच आयटीआर नंबरवर दोन मतदारांचे नाव असल्याचेही निदर्शनास आले असून या गोंधळामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नवी मुंबईमधील ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४ लाख ३९ हजार व बेलापूर मतदारसंघात ३ लाख ७९ हजार मतदारांचा समावेश आहे. याशिवाय आचारसंहिता लागू केल्यानंतर अनेक नागरिकांनी ऑनलाइन अर्ज भरला आहे. परंतु, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या अनेकांची नावे मतदार यादीमधून गायब झाली आहेत. काही तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरला. परंतु, त्यांचे नावच यादीमध्ये आलेले नाही. बेलापूर मतदारसंघामध्ये राहणाऱ्या रेवती बंगेरा यांचे मतदार यादीमध्ये नाव होते. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीमध्ये मतदानही केले आहे. परंतु, २०२४ च्या मतदार यादीमधून त्यांचे नाव गायब झाले आहे. मतदारयादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बेलापूर परिसरातील दीपक साठे यांचा आयटीआर नंबर ४००३७२९ असा आहे. या नंबरचे निवडणूक ओळखपत्रही त्यांच्याकडे आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीसाठी हा आयटीआर नंबर सरीला तानवडे यांच्या नावावर दाखविला जात आहे.

              घणसोली परिसरामध्येही अनेक मतदारांची नावे यादीतून गायब झाली आहेत. राजश्री जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची नावे मतदारयादीमध्ये आलेली नाहीत. मोहित जाधव या तरुणाने ऑनलाइन अर्ज भरला होता. अर्ज भरल्याविषयी संदेशही प्राप्त झाला होता. पण प्रत्यक्षात मतदारयादीमध्ये त्याच्या नावाचा समावेश झालेला नाही. ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी अशाप्रकारे मतदार यादीमधून अनेकांची नावे गायब झाली असून त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानElectionनिवडणूक 2024