शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

सिडकोच्या १० हजार घरांची संगणकीय सोडत, दोन लाख घरे बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:33 AM

स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील शिल्लक ८१० आणि नव्याने उभारलेल्या गृहप्रकल्पातील नऊ हजार २४९ अशा सिडकोच्या दहा हजार घरांसाठी मंगळवारी संगणकीय सोडत काढण्यात आली.

नवी मुंबई : स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील शिल्लक ८१० आणि नव्याने उभारलेल्या गृहप्रकल्पातील नऊ हजार २४९ अशा सिडकोच्या दहा हजार घरांसाठी मंगळवारी संगणकीय सोडत काढण्यात आली. नेरुळ येथील आगरी कोळी भवनमध्ये पार पडलेल्या या सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामुळे घरांसाठी अर्ज केलेल्या सुमारे एक लाख अर्जदारांना घरी बसून सोडत पाहता आली.सिडकोने आगामी काळात विविध आर्थिक घटकांसाठी जवळपास दोन लाख घरे बांधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यापैकी ९५ हजार घरांच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील नऊ हजार २४९ घरांच्या विक्रीसाठी सप्टेंबर २०१९ मध्ये आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्याचबरोबर स्वप्नपूर्ती या जुन्या गृहप्रकल्पातील शिल्लक ८१० घरांसाठीही अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या दोन्ही गृहप्रकल्पातील दहा हजार घरांसाठी जवळपास एक लाख अर्ज सिडकोला प्राप्त झाले होते. त्याची संगणकीय सोडत मंगळवारी काढण्यात आली. या वेळी माजी सनदी अधिकारी सुरेशकुमार, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे उपमहासंचालक मोईज हुसैन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत पार पडली. सोडत पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या पणन विभागाने विशेष परिश्रम घेतले.दरम्यान, या सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. सिडकोने गेल्या वर्षी १५ हजार घरांची सोडत काढली होती. या योजनेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. राज्यभरातून जवळपास पावणेदोन लाख अर्ज दाखल झाले होते. या योजनेतील यशस्वी अर्जदारांना टप्प्याटप्प्याने घरांचे वाटपपत्रे दिले जात आहे. मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांनाही अशाच प्रकारे सदनिकांचे वाटप केले जाणार आहे.सिडकोच्या नवीन गृहप्रकल्पातील ९,२४९ घरांपैकी ३,१७६ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर ६,०७३ घरे अल्प उत्पन गटासाठी आहेत. स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या ८१० घरांपैकी ११५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल तर ६१५ घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.

टॅग्स :cidcoसिडकोHomeघरMaharashtraमहाराष्ट्र