शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिलासा

By admin | Updated: December 12, 2015 01:51 IST

सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांनी विरोध केला तरी नवी मुंबई स्मार्ट सिटी करण्यासाठी शिवसेना व भाजपा नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना वस्तुस्थिती सांगितले. मुख्यमंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या असून त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये नवी मुंबईला देशात तिसरे व राज्यात प्रथम मानांकन मिळाले होते. यामुळे ९८ शहरांच्या स्पर्धेमध्ये नवी मुंबईला पहिला क्रमांक मिळेल असा विश्वास नागरिकांना वाटू लागला होता. पहिल्यांदाच विकासकामांचे धोरण ठरविताना नागरिकांचे मत ऐकून घेण्यात आले होते. चार लाख नागरिकांनी त्यांच्या संकल्पना महापालिकेस कळविल्या होत्या. परंतु सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव फेटाळल्यामुळे महापालिकेच्या सहभागाविषयी शंका उपस्थित केली जात होती. याविषयी शहरवासीयांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना व भाजपाने आंदोलन करून राष्ट्रवादीचा निषेध केला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार मंदा म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँगे्रसने राजकारण करून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव फेटाळला आहे. परंतु शहरवासीयांना स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभाग हवा आहे.नवी मुंबई देशातील एक क्रमांकाचे शहर झाले पाहिजे अशी सर्वांची भावना असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीविषयी प्रस्ताव १५ डिसेंबरच्या आतमध्ये केंद्र शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती घेवून तत्काळ हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार असून स्मार्ट सिटी स्पर्धेतील सहभागी होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनीही राज्याच्या मुख्य सचिवांना स्मार्ट सिटी प्रस्तावाचे प्रेझेंटेशन दाखविले. महापालिका ८ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी बॅकफूटवर जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रस्तावाविषयी आक्षेप असतील तर ते दुरूस्त करावे परंतु राजकारण करून स्पर्धेतून माघार घेवू नये, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत. (प्रतिनिधी)नवी मुंबईचा स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभाग झालाच पाहिजे अशी लोकभावना आहे. प्रस्तावामध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधारणा करता येवू शकते.त्यासाठी स्पर्धेतून माघार हा उपाय नाही. यामुळे स्मार्ट सिटीसाठी वेळेत प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे