शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेतील मंदिरांना सिडकोच्या नोटिसा

By admin | Updated: November 17, 2016 06:30 IST

महापालिकेपाठोपाठ सिडकोनेही अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

नवी मुंबई : महापालिकेपाठोपाठ सिडकोनेही अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचे पाऊल उचलले आहे. कोपरखैरणेतील मैदानांलगतच्या मंदिरांना नोटिसा बजावून कारवाईचे संकेत दिले आहेत; परंतु सिडकोच्या नियोजनातील त्रुटींचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याची टीका रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.कोपरखैरणे सेक्टर ५ ते ८ व १५ ते १८ येथील मैदानालगतच्या मंदिरांना सिडकोने नोटिसा बजावल्या आहेत. ही धार्मिक स्थळे विनापरवाना असल्यामुळे नोटिसा बजावल्यापासून १५ दिवसांच्या मुदतीत मंदिराचे बांधकाम हटवण्याचे नोटीसमार्फत सूचित करण्यात आले आहे. सिडकोने कोपरखैरणे विभागाचा विकास करताना प्रत्येक चार सेक्टरच्या केंद्रस्थानी खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार रहिवाशांना आवश्यक असणाऱ्या सुविधांचाही त्यावेळी विचार होणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्यामुळे सद्यस्थितीला कोपरखैरणे विभागाची बिकट परिस्थिती झाली आहे. नियोजनाच्या अभावामुळे पार्किंगची सर्वात मोठी समस्या या विभागातील रहिवाशांना भेडसावत आहे. तर विविध सोयी-सुविधांसाठी सिडकोने भूखंडच राखीव न ठेवल्यामुळे उपलब्ध जागेतच अनेकांनी धार्मिक स्थळे बांधलेली आहेत. अशाच दोन धार्मिक स्थळांवर कारवाईचे संकट निर्माण झाले आहे. सुमारे २० वर्षांहून अधिक जुनी ही धार्मिक स्थळे असून मागील ६ ते ७ वर्षांत त्यांची पुनर्बांधणी झालेली आहे. वारकरी सांप्रदायाच्या नागरिकांकडून त्याठिकाणची देखभाल केली जाते. मात्र, सिडकोने ही धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवून नोटिसा बजावल्या आहेत; परंतु सिडकोने धार्मिक स्थळांसाठी जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे पर्यायी जागेत या मंदिरांचे बांधकाम करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सिडकोने धार्मिक स्थळांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या असत्या, तर ही वेळच आली नसती असाही त्यांचा रोष आहे. त्यामुळे सिडकोच्या नियोजनातील त्रुटीचा फटका विभागातल्या रहिवाशांना बसत आहे. (प्रतिनिधी)