शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

अधिकृत बांधकामांना सिडकोच्या नोटिसा

By admin | Updated: August 16, 2015 23:53 IST

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत सिडकोने शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पुन्हा एकदा कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या पहिल्या

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत सिडकोने शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पुन्हा एकदा कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात २१९ बांधकामांना नोटिसा पाठविल्या आहेत. मात्र यातील अनेक बांधकामे पात्र असतानाही त्यांना नोटिसा बजावण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांत असंतोष पसरला आहे. त्यामुळे या विरोधात पुन्हा आंदोलन छेडण्याची तयारी प्रकल्पग्रस्तांनी चालविली आहे.शासनाने २०१२ पर्यंतच्या बांधकामांना अभय देण्याचे धोरण जाहीर केले आहे. असे असले तरी १ जानेवारी २०१३ नंतरच्या सर्व बांधकामांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यानुसार सिडकोने शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध केल्याने जून महिन्यात सिडकोला ही कारवाई काही काळ स्थगित करावी लागली होती. कोणती बांधकामे नियमित होणार आणि कोणावर कारवाई होणार याची यादी जाहीर करा, अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांच्या सर्वपक्षीय नेत्यांनी सिडकोकडे केली होती. त्यानुसार सिडकोने मागील दीड महिन्यापासून कारवाई स्थगित केली होती. मात्र आता पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत निवडक २१९ बांधकामांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र नोटिसा पाठविण्यात आलेली अनेक बांधकामे नियमित होण्यास पात्र असल्याचे दिसून आले आहे. वाशी सेक्टर ३० येथील भूखंड क्रमांक ४५१ वर उभारलेल्या बांधकामाला सिडकोने नोटीस पाठविली आहे. प्रत्यक्षात मात्र हे बांधकाम २००४चे आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम गरजेपोटी करण्यात आले असून स्वत: बांधकामधारक येथे राहत आहेत. इतकेच नव्हे, तर गेल्या ११ वर्षांत येथे कोणतेही अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार हे बांधकाम नियमित होण्यास पात्र आहे. असे असतानाही सिडकोने गुगल अर्थच्या सहाय्याने हे बांधकाम अनधिकृत ठरवून त्याला नोटीस बजावली आहे. बांधकामधारक मेघनाथ भगत यांनी सिडकोच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपले बांधकाम अधिकृत असल्याचे कागदोपत्री सर्व पुरावे, सिडकोला सादर केले आहे. इतकेच नव्हे, तर २००४ पासून आतापर्यंतचे गुगल अर्थचे छायाचित्रेही सिडकोला सादर केली आहेत. पुन्हा एकदा शहानिशा करून गरजेपोटी बांधलेले बांधकाम तोडू नये, अशी विनंती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे केली आहे. सिडकोच्या यादीत अनेक त्रुटी आहेत. अनेक बांधकामांवर यापूर्वीच कारवाई झाली आहे. काही ठिकाणी कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही यादी रद्द करावी. गरजेपोटीच्या घरांबाबत धोरण स्पष्ट झाल्यानंतरच पुढील यादी जाहीर करावी, अशी मागणी कृती समितीचे सचिव नीलेश पाटील यांनी केली आहे. (प्रतिनिधी)