शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आसुडगावजवळील सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्पही अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:26 IST

ट्रक टर्मिनलवरील इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न : बांधकामाच्या वेळी पार्किंगचाही मोठा प्रश्न

कळंबोली : पंतप्रधान आवास योजनेला खांदेश्वर, मानसरोवर तसेच खांदा कॉलनीत जोरदार विरोध होत आहे. तसेच आसुडगाव येथील ट्रक टर्मिनल्सच्या वरती जे टॉवर बांधले जातील तेही सुरक्षित कसे राहतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्याशिवाय जेव्हा काम सुरू होईल त्याप्रसंगी जड वाहने कुठे उभी करायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून, याविषयी सिडकोला निवेदनही दिले आहे.

नवी मुंबई तसेच पनवेल परिसरात सिडकोचे जितके बस टर्मिनल्स आहेत. तिथे खाली बस थांबे व वरती पंतप्रधान आवास योजनेच्या नावाने गरीब व गरजूंकरिता घरे बांधली जाणार आहेत. सिडकोने अलीकडेच हे नियोजन केले आहे. त्याकरिता त्यांनी पहिल्या नियोजनामध्ये बदल केला आहे. इतर भूखंड विकण्यासाठी मिळावेत म्हणून त्यांच्याकडूनही धोरण हाती घेण्यात आल्याचा आरोप विविध सामाजिक संस्था करीत आहेत. खांदेश्वर, मानसरोवर आणि खांदा कॉलनीत येथील भूखंडावर अशा प्रकारे घरे बांधण्याकरिता तीव्र विरोध आणि नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रक टर्मिनल्ससाठी प्लॅन करण्यात आलेल्या जागेवरही अशाच प्रकारे इमारती बांधल्या जाणार आहेत. आसुडगाव एनएमएमटी आगारासमोर सिडकोची दोन भूखंडावर मोठी पार्किंग आहेत. त्या ठिकाणीही खाली वाहनतळ आणि वरती पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधली जाणार आहेत.

खांदा वसाहतीच्या आजूबाजूला मोठी हाउसिंग स्कीम राबविण्याचे सिडकोचे नियोजन आहे; परंतु ज्या कारणाकरिता ही जागा राखीव आहे, त्याला दुय्यम स्थान देत त्या जागेवर गृहनिर्माण करण्यात येत आहे. याबाबतही वेगवेगळ्या पद्धतीने विरोध होत आहे.या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर या वाहनतळावर उभे राहणारे ट्रक, ट्रेलर, डम्पर ही अवजड वाहने कुठे उभी राहणार, असा प्रश्न प्रभाग समिती ‘ड’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोचे एमडी व मुख्य नियोजनकाराला विचारला आहे. वाहने उभी करण्याकरिता पर्यायी व्यवस्था सिडकोने केली नाही. ती अगोदर करावी आणि मगच हा प्रकल्प हाती घ्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.रस्त्यावर वाहने उभी राहण्याची शक्यताच्ट्रक ट्रर्मिनल्सच्या जागेवर इमारतीचे काम हाती घेतल्यानंतर जेएनजीटी, स्टील मार्केट आणि इतर जाण्याकरिता येथे आलेल्या वाहनांना उभे राहण्याकरिता जागाच शिल्लक राहणार नाही.च्मग ते कॉलनीतील रस्त्यावर उभे राहतील, यामुळे कोंडी, अपघात होतील याचा विचार सिडकोने केला नसल्याचे मत भाजपचे पदाधिकारी दशरथ म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

याला जबाबदार कोण?च्भविष्यात वाहनतळ खाली झाले आणि वरती इमारती उभ्या राहिल्या. दुर्दैवाने एखादा रसायनच्या टँकरचा स्फोट झाला. किंवा इतर वाहनांना आग लागली, त्या वेळी इमारतीला धोका पोहोचणार नाही का? याला जबाबदार कोण असेल, असे प्रश्नच्नवनाथ मेंगडे यांना पडले आहेत. सिडकोने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करून हा प्रकल्प उभारावा, असे मत खांदा कॉलनीतील रहिवासी रोहण व्हटकर यांनी व्यक्त केले.