शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या गृहप्रकल्पाला महारेराचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:56 IST

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम पुढील महिनाभरात सुरू करण्याची सिडकोची योजना आहे.

कमलाकर कांबळे ।नवी मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम पुढील महिनाभरात सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी त्याची महारेराकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. परंतु या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची परवानगीच मिळाली नसल्याने हा प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई क्षेत्रात विविध आर्थिक घटकांसाठी पुढील पाच वर्षांत ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. मागील दोन-तीन वर्षांत यापैकी जवळपास पाच हजार घरे बांधण्यात आली आहेत. तर अल्प व अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी १५ हजार १५२ घरांच्या प्रकल्पाचे नियोजन पूर्ण झाले आहे. ही घरे घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी या नोडमध्ये बांधली जाणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. सिडकोच्या विविध गृहप्रकल्पांची कामे केलेल्या बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन या कंपनीला या नव्या गृहप्रकल्पाच्या उभारणीचे काम देण्यात आले आहे. पुढील महिनाभरात एकाच वेळी पाचही नोडमधील गृहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याची सिडकोची योजना आहे. या घरांची अंदाजित किंमतही निश्चित करण्यात आली आहे. परंतु तळोजा येथील नियोजित गृहप्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.विशेष म्हणजे नवीन गृहप्रकल्प उभारताना म्हाडा आणि सिडको या राज्य सरकारच्या अंगीकृत महामंडळांनाही महारेराकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या गृहप्रकल्पांची नोंदणी करण्यासाठी ३१ जुलैची मुदत देण्यात आली होती. परंतु पर्यावरणाच्या परवानगीअभावी सिडकोला तशी नोंद करता आली नाही. असे असले तरी संबंधित परवानगी प्राप्त होताच नियमानुसार महारेराकडे नोंदणी केली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या प्रस्तावित असलेल्या पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू होताच आणखी एक पंधरा हजार घरांचा गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सिडकोच्या संबंधित विभागाकडून देण्यात आली.