शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

सिडको अधिकाऱ्यांना फुटला घाम

By admin | Updated: December 11, 2015 01:26 IST

सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रहिवाशांची सहानुभूती मिळविण्यासाठी राजकीय पक्ष मोर्चे,

कळंबोली : सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रहिवाशांची सहानुभूती मिळविण्यासाठी राजकीय पक्ष मोर्चे, आंदोलन करीत आहेतच. बुधवारी एका अधिकाऱ्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. रहिवाशांच्या संतापामुळे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत ४ हजार ४० सदनिका आणि २ हजार ६५० सोसायट्या आहेत. कळंबोलीत पाच हजार ९०० सदनिका आणि सुमारे ११५० सोसायट्या आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून पाणीपुरवठा करण्याकरिता सिडकोला दररोज एमजेपीकडून ८५ एमएलडी पाण्याची गरज आहे. खारघर आणि कामोठे येथे सुमारे पाच हजारांच्या जवळपास ग्राहक असून त्यांना ५0 पेक्षा जास्त एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. याकरिता नवी मुंबई महापालिकेकडून ३८ एमएलडी पाणी घ्यावे लागते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २५ टक्के पाणीकपात केली असल्याने ओढूनताणून फक्त ६० एमएलडी पाणी सिडकोला मिळत आहे. ते सुध्दा अनियमित आणि कमी दाबाने त्यामुळे नवीन पनवेल व कळंबोलीत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.नवी मुंबई महापालिकेने सुध्दा पाणीकपात केली आहे. त्यामुळे सिडकोविरोधात रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. पाणीपुरवठा विभागावर दररोज मोर्चे व आंदोलने येत आहेत. त्यातच महानगरपालिकेचे वारे वाहू लागल्याने सर्वच राजकीय पक्ष हा मुद्दा उचलून धरू लागले आहेत. बुधवारी आरपीआय व भारतीय जनता पक्षाने कामोठे सेक्टर ६ येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चा काढून भाजपा कार्यकर्ते थांबले नाहीत, तर त्यांनी कार्यकारी अभियंता दिलीप बोकडे यांच्यावर शाई फेकली. कळंबोलीतही हीच स्थिती असून पाणीपुरवठा विभागात तक्र ारींचा ढीग पडला आहे. जोपर्यंत पाणी वितरणाबाबत योग्य नियोजन होत नाही, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना होत नाही, तोपर्यंत पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)