शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक

By admin | Updated: March 21, 2015 01:42 IST

यापुढे ज्या लिफ्टमध्ये काचेचे दरवाजे नसतील अशा बंद लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई : यापुढे ज्या लिफ्टमध्ये काचेचे दरवाजे नसतील अशा बंद लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. शिवाय व्यावसायिक इमारतींप्रमाणे निवासी इमारतींमध्येही काचेच्या पारदर्शक लिफ्ट बसविण्याबद्दल निर्णय घेतला जाईल. त्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधण्यात येईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. मुंबईतील हजारो इमारतींमध्ये असणाऱ्या लिफ्टची तांत्रिक तपासणी करणाऱ्या निरीक्षकांची रिक्त पदे भरण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
मॉलमध्ये काचेच्या लिफ्टना
परवानगी दिली जाते आणि
निवासी वापराच्या उंच इमारतींना
मात्र तशी परवानगी दिली जात नाही. अशा लिफ्टमध्ये वाटेल ते प्रकार घडतात. महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो, असे प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. त्यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, की लिफ्ट तपासणिसांची संख्या कमी असली तरी त्यांची भरती करण्याची प्रक्रिया चालू आहे. लिफ्टच्या सुरक्षेसाठी आवश्यक निर्देश देण्यात येतील. (प्रतिनिधी)

बंद लिफ्टमध्ये कॅमेरे पाहिजेत, असे बंधन घातले जाईल. या लिफ्टमध्ये एक व्यक्ती जास्त झाली तरी धोक्याची बीप वाजली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

नॉन क्रीमी लेयरची मर्यादा वाढविणार
आगामी शैक्षणिक वर्षापासून नॉन क्रीमी लेयरची मर्यादा ४.५० लाखावरून ६ लाख रुपये करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधान परिषदेत केली.
मागासवर्गीय, विमुक्त
जाती, भटक्यात जाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नॉन क्रीमी लेयरची उत्पन्नमर्यादा ४.५० लाखांवरून
६ लाख करण्याबाबतचा तारांकित प्रश्न अपूर्व हिरे यांनी उपस्थित केला होता.

शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी द्यावी लागते टक्केवारी !
मुंबई : राज्यातील शिक्षण संस्थांना आपल्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करून घेण्यासाठी संबंधित समाजकल्याण विभागातील अधिकारी हे सव्वा टक्केवारी घेत असून, तशा तक्रारी अनेक संस्थाचालकांनी आपल्याकडे दिल्या आहेत, असे सांगत उपसभापती वसंत डावखरे यांनी राज्याच्या समााजिक न्याय विभागाचे वाभाडे काढले.
शिष्यवृत्तीसाठी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी दलाली घेतल्याशिवाय प्रकरणे मंजूर करीत नाहीत़ समाजकल्याण विभागातील अनागोंदी ही राज्याला भूषणावह नाही. अशा तक्रारीची नोंद घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश उपसभापती डावखरे यांनी विधान परिषदेत दिले. यावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अशा प्रकारच्या तक्रारीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या थकीत शिष्यवृत्तीसंदर्भात निरंजन डावखरे, धनंजय मुंडे आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर राज्यात मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या १६ लाख १६ हजार ३६९ प्रकरणपिंैकी ६ लाख ६ हजारांच्या दरम्यान प्रकरणे निकाली काढण्यात आले असून, उर्वरित प्रकरणे ही लवकरच निकाली काढली जातील. शिष्यवृत्तीसाठी आमच्याकडे ३ हजार ८०६.५४ कोटींची मागणी होती. यंदा आम्ही ७१४ कोटींची तरतूद केली असल्याची माहिती बडोले यांनी दिली. (प्रतिनिधी)