विकासकाच्या मृत्यूप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा; छळातून सुटकेसाठी १५ कोटींच्या मागणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 07:14 IST2026-03-29T07:13:56+5:302026-03-29T07:14:14+5:30

याचिकेनंतर कोर्टाचा आदेश

Case Registered Against Senior Officials in Developer death Case Court Orders Action Following Petition | विकासकाच्या मृत्यूप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा; छळातून सुटकेसाठी १५ कोटींच्या मागणीचा आरोप

विकासकाच्या मृत्यूप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा; छळातून सुटकेसाठी १५ कोटींच्या मागणीचा आरोप

नवी मुंबई : विकासक गुरुनाथ चिचकर आत्महत्याप्रकरणी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे, आकाश मलिक, तसेच नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीच्या नावाखाली पैसे मागितल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तब्बल ११ महिन्यांनी ही कारवाई झाली.

बेलापूर येथील विकासक गुरुनाथ चिचकर यांनी २५ एप्रिल २०२५ रोजी राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एनसीबी आणि स्थानिक अमली पदार्थ विरोधी पथकाकडून होत असलेल्या छळाचा उल्लेख केल्याचे समोर आले होते. गुरुनाथ यांच्या पत्नी किरण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप 
केले होते. 

प्रकरणाचा आढावा

२५ एप्रिल २०२५ : गुरुनाथ चिचकर यांची आत्महत्या
चिठ्ठीत छळाचा उल्लेख
पत्नीची उच्च न्यायालयात याचिका
११ महिन्यांनंतर अखेर  तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा
एनआरआय पोलिस ठाण्यात नोंद

दोन्ही मुलांवर गुन्हे

चिचकर यांच्या दोन्ही मुलांवर मुंबई व नवी मुंबईत अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असून, सुमारे २०० कोटी रुपयांच्या प्रकरणात एनसीबी त्यांचा शोध घेत होती. त्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक वारंवार घरी येत असल्याचेही नमूद केले आहे. 

या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर शुक्रवारी रात्री एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. यापूर्वी आत्महत्येनंतर ‘एडीआर’ नोंदवून तपास करण्यात आला होता. मात्र, त्यातून ठोस निष्कर्ष समोर आला नव्हता. आता न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू होणार असून, पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
 

Web Title : विकासक की मौत के मामले में वरिष्ठ अधिकारियों पर मामला दर्ज: उगाही का आरोप

Web Summary : एनसीबी अधिकारियों पर विकासक गुरुनाथ चिचकर की आत्महत्या के लिए मामला दर्ज। आरोप है कि उन्होंने जांच के नाम पर 15 करोड़ रुपये की मांग की, जिससे उन्होंने यह कदम उठाया। पत्नी की याचिका के बाद उच्च न्यायालय ने जांच के आदेश दिए।

Web Title : Officials Booked in Developer's Death: Extortion Allegations Surface

Web Summary : NCB officials booked for abetting developer Gurunath Chichkar's suicide. Allegedly, they demanded ₹15 crore under the guise of investigation, leading to his extreme step. High Court orders probe after his wife's petition.