खारघरमधील भाजपा नगरसेवकावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 11:59 IST2020-11-23T11:49:18+5:302020-11-23T11:59:47+5:30

BJP corporator in Kharghar News : खारघरमधील भाजपाचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case filed against BJP corporator in Kharghar | खारघरमधील भाजपा नगरसेवकावर गुन्हा दाखल 

खारघरमधील भाजपा नगरसेवकावर गुन्हा दाखल 

पनवेल - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जमावबंदी तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा सुरू असताना देखील वाढदिवसानिमित्ताने मित्रांसमवेत पार्टी करणाऱ्या खारघरमधील भाजपाचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाचे नगरसेवक निलेश बाविस्कर हे खारघर मधील सेक्टर 15 परिसरातून निवडून आलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र जमावबंदी लागू आहे. संचारबंदी, जमावबंदी असल्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक कामाखेरीज वावरता येत नाही. एवढी गंभीर परिस्थिती असताना लोकप्रतिनिधी असलेल्या निलेश बाविस्कर यांनी वाढदिवसाची पार्टी आयोजित करून गर्दी जमवली होती. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

Web Title: Case filed against BJP corporator in Kharghar