शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्लरविरोधात शहरात मोहीम तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:27 IST

हुक्का पार्लर चालविणाºयांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांमध्ये ४ ठिकाणी छापा टाकला आहे. एक वर्षामध्ये ८ हुक्का पार्लरवर कारवाई केली असून, तब्बल ६७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

नामदेव मोरे ।नवी मुंबई : हुक्का पार्लर चालविणाºयांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांमध्ये ४ ठिकाणी छापा टाकला आहे. एक वर्षामध्ये ८ हुक्का पार्लरवर कारवाई केली असून, तब्बल ६७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.डान्स बार सुरू होण्यामधील अडचणी व महामार्गानजीकच्या बारवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीमुळे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू करण्यात आले आहेत. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हुक्का पार्लरच्या मालकांनी सोशल मीडियामधून जाहिराती सुरू केल्या आहेत. हुक्का पार्लरमधील व्हिडीओ इंस्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल मीडियावरून पाठविले जात आहेत. तरुणाईला व्यसनांच्या जाळ्यात अडकविले जात आहे. अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थीही हुक्का ओढत असल्याचे चित्र पाहावयास मिळू लागले होते. याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनीही तक्रारी सुरू केल्या होत्या. ‘लोकमत’ने याविषयी स्टिंग आॅपरेशन करून वास्तव समोर आणले होते. वास्तविक हुक्का पार्लरवर कारवाई करणे फक्त पोलिसांची जबाबदारी नसून महापालिका व अन्न व औषध प्रशासनाचीही तितकीच जबाबदारी होती. पण त्यांच्याकडून कारवाई केली जात नसल्याने अमली पदार्थ विरोधी पथकाने बेकायदेशीर हुक्का पार्लरविरोधात मोहीम हाती घेतली आहे.अमली पदार्थ विरोधी पथकाने एक वर्षामध्ये तब्बल ८ ठिकाणी छापा टाकला आहे. आतापर्यंत ६७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. १ व २ आॅगस्टला चार ठिकाणी कारवाई केली असून १८ जणांवर गुन्हे दाखल केले. कारवाईमुळे अवैधपणे व्यवसाय करणाºयांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी पार्लरबरोबर हुक्का ओढणाºयांवरही कारवाई सुरू केली आहे. यापुढे शहरात कुठेही अवैधपणे व्यवसाय होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, अजिम गोळे, राणी काळे, संजय चौधरी, सलीम इनामदार, इकबाल शेख, संतोष गायकवाड, कासम पिरजादे, रमेश उटगीकर, संजयसिंग ठाकूर, अश्विनी चिपळूणकर, सचिन भालेराव, राजेश गाढवे, अमोल कर्डीले, अमोल गागरे, सुप्रिया ठाकूर, आकाश मुके व बाबासाहेब सांगोळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.