शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत सुविधांचा बोजवारा; दफनभूमीत मोबाइलच्या टॉर्चने विधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:49 IST

बर्निंग स्टँडची दुरवस्था

योगेश पिंगळेनवी मुंबई : नेरु ळ सेक्टर २ मधील मध्यवर्ती स्मशानभूमीत विविध समस्यांचा बोजवारा उडाला आहे. स्मशानभूमीतील बर्निंग स्टँडची दुरवस्था झाली असून दगडांच्या आधाराने स्टँड उभे करण्यात आले आहेत. तसेच दफनभूमीतील विद्युत खांब बंद असून रात्रीचा काळोख पसरत असल्याने मोबाइलच्या टॉर्चच्या प्रकाशात विधी करावे लागत आहेत. या सर्व प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

२१ व्या शतकातील शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. शहरात नागरिकांच्या सोयी-सुविधांची अनेक महत्त्वाची अत्याधुनिक कामे करण्यात आली असून यामुळे शहराचा नावलौकिक देखील वाढला आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये महापालिकेच्या माध्यमातून मध्यवर्ती स्मशानभूमी बांधण्यात आल्या आहेत. तसेच स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी लाकूड, गोवऱ्या, मीठ, डिझेल आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु देण्यात आलेल्या सेवा सुविधांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून सुविधा अपुºया पडू लागल्या आहेत याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नेरु ळ सेक्टर २ मधील मध्यवर्ती स्मशानभूमीमधील बर्निंग स्टँड मोडकळीस आले आहेत. अनेक वेळा अंत्यविधी सुरू असताना लाकडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून स्टँडच्या दुरु स्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. विधी करण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने स्टँडला दगडांचा आधार देऊन उभे करण्यात आले आहे. याच स्मशानभूमीमधील दफनभूमीमध्ये एक विद्युत खांब आहे. सदर विद्युत खांब नादुरु स्त असून रात्री अनेक वेळा बंद असतो. रात्री दफनविधी करताना काळोख असल्याने मोबाइलच्या टॉर्चचा आधार घेऊन विधी करण्याची वेळ नागरिकांवर आली असून आजवर अनेक विधी मोबाइल टॉर्चच्या उजेडात करण्यात आले आहेत. या स्मशानभूमी परिसरात एका बाजूला मलनि:सारण केंद्र असून एका बाजूला खाडी आणि नाले आहेत त्यामुळे परिसरात सापांचा वावर मोठ्या प्रमाणावर असून विद्युत पुरवठा बंद असल्याने विधीसाठी येणाºया नागरिकांच्या आणि या ठिकाणी काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.