शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या हत्येप्रकरणी दिराला अटक

By admin | Updated: August 28, 2015 23:36 IST

मूल होत नसल्यावरून तुर्भे इंदिरानगर येथील विवाहितेचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. याच प्रकारात सदर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामध्ये १०० टक्के

नवी मुंबई : मूल होत नसल्यावरून तुर्भे इंदिरानगर येथील विवाहितेचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. याच प्रकारात सदर विवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामध्ये १०० टक्के भाजलेल्या या विवाहितेचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला आहे.छाया कांबळे (२५) असे मयत विवाहितेचे नाव आहे. २० आॅगस्ट रोजी तिला राहत्या घरात जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. प्रथमदर्शनी तिची आत्महत्या असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. अखेर तिच्या जबानीमध्ये सासरच्यांनी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिच्यावर वाशीतील पालिका रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. त्यानुसार छाया कांबळे हिच्या हत्येप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००७ साली तिचे रमेश कांबळे याच्यासोबत लग्न झाले आहे. लग्नापासून ती सासरच्यांसोबत तुर्भे येथील इंदिरानगरमध्ये राहत होती. परंतु लग्नाला ८ वर्षे होवूनही मूल होत नसल्याने सासरच्यांकडून तिचा छळ सुरू होता. अनेकदा तिला मारहाणही केली जायची. अखेर घटनेच्या दिवशी त्यांच्यात पुन्हा वाद झाला असता सासू कमल व दीर उमेश यांनी तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी छाया हिने स्वत:च्या बचावासाठी पतीकडे धाव घेतली असता त्यानेही तिला ढकलून दिले. यामध्ये तिचा पती रमेश हा देखील भाजला होता. याप्रकरणी दोघांनाही वाशीच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर शुक्रवारी पहाटे छायाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दीर उमेश कांबळे याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तर सासू कमल व पती रमेश यांनाही लवकरच अटक केली जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)