शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

खेळाची अभ्यासक्रमाशी सांगड घालावी- ब्रायन लारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 3:11 AM

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने ब्रायन लाराला क्रिकेटमधील कामगिरीसाठी डॉक्टरेट बहाल केली.

नवी मुंबई : विद्यार्थ्यांनी खेळ आणि अभ्यासक्रम यांची योग्य सांगड घालावी. ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम केले की यश मिळतेच, असे मत वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे. आयुष्याचा प्रवास उलगडून सांगताना भारतीयांच्या आपुलकीने भारावून गेल्याचे मतही त्याने व्यक्त केले.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने ब्रायन लाराला क्रिकेटमधील कामगिरीसाठी डॉक्टरेट बहाल केली. नेरूळमधील विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमात लाराने सांगितले की, वडिलांचा त्याग व स्वत:ला सिद्ध करण्यासाठी केलेल्या परिश्रमामुळे यश मिळविता आले. विद्यार्थ्यांनी खेळ व अभ्यासक्रम दोन्हींची योग्य सांगड घालावी. जीवनाचे ध्येय निश्चित करून परतीचे दोर कापून टाकून समोर येईल त्या प्रसंगांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. येणाऱ्या प्रसंगांना धैर्याने सामोरे गेले की यश मिळतेच असेही त्याने सांगितले. लहानपणीच्या आठवणी, वेस्ट इंडिजमधील खेळाडूंना खेळताना आलेले चांगले- वाईट अनुभव याचीही माहिती त्याने यावेळी दिली. भारतीयांच्या प्रेम व आपुलकीने भारावून गेलो असल्याचेही मतही त्याने यावेळी व्यक्त केले. डॉ.डी. वाय. पाटील स्टेडियमची पाहणी करून तेथील सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. येथे चांगल्या सुविधा असून भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यास मदत होईल असे मतही व्यक्त केले.डॉ. विजय पाटील यांनीही वर्ल्ड कप सुरू असून समालोचनाची जबाबदारी लारा याच्यावरही आहे. व्यस्त वेळापत्रक असतानाही त्याने वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी अ‍ॅबी कुरविला, शिवानी पाटील, डॉ. शिरीष पाटील, पी. व्ही. भागवत व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई