शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चेबांधणीला सुरुवात

By admin | Updated: November 12, 2015 01:50 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा खाली बसत नाही तोपर्यंतच जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे.

आविष्कार देसाई, अलिबागग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा धुरळा खाली बसत नाही तोपर्यंतच जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला आहे. नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नजर टाकल्यास सर्वच राजकीय पक्षांची पावले स्थानिक पातळीवरील सोयीस्कर राजकारणाकडे पडत असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, तळा, पोलादपूर, खालापूर, सुधागड-पाली येथील ग्रामपंचायचींचे रुपांतर आता नगरपंचायीतीमध्ये होणार आहे. प्रशासनाने त्या दिशेन आपल्या तयारीला सुरुवात केली आहे. नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. प्रामुख्याने माणगाव नगरपंचायतीचे आरक्षण खुल्या प्रवर्गाच्या पुरुषासाठी आले आहे. म्हसळा-इतर मागास वर्गीय (पुरुष), तळा, पोलादपूर आणि खालापूर नगरपंचायतींसाठी खुला वर्गाची महिला विराजमान होणार आहे. सुधागड-पाली नगर पंचायतीच्या निवडणुकीला न्यायालयीन कारणामुळे स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील आरक्षण काढण्यात आलेले नाही.नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सध्या रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे सख्य वाढल्याने त्यांची आघाडी नगर पंचायतीच्या निवडणूकीतही कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना-भाजपा हे जिल्ह्यातील निवडणूकीसाठी शेकापचे शत्रु राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सुपडासाफ झाल्याने काँग्रेस अद्यापही त्या पराभवाच्या छायेतून बाहेर आल्याचे दिसत नाही. त्यांनी नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निश्चय केला आहे. युती- आघाडी बाबत कोणाकडून विचारणा झाल्यास त्यावर पक्ष विचार करेल जिल्हा काँग्रेसचा होरा आहे.भाजपाला निवडणूक लढवाची असून अद्याप युती-आघाडीबाबत निर्णय झाला नसून स्थानिक राजकारणाचा विचार करुन निर्णय घेण्यावर त्यांचा कल असल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार करुनच हि निवडणूक लढविली जाईल असे एकंदर चित्र आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सोयीस्कर राजकारणाचा डाव येथे खेळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.शिवसेना आणि भाजपा सोडून इतर मित्र पक्षाबरोबर ही निवडणूक लढविली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचातींच्या निवडणुकीत शेकापने उत्तम विजय संपादीत केला आहे. नगर पंचायतीवरही आमचे वर्चस्व राहील.- आमदार जयंत पाटील , सरचिटणीस, शेकापनगर पंचायतीची निवडणूक लढणार एवढे निश्चित आहे. युती कोणत्या पक्षाबरोबर करायची हे ठरलेले नाही. याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणाचा त्यावेळी जरूर विचार केला जाईल.- बाळासाहेब पाटील,जिल्हाध्यक्ष, भाजपा