शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

घरे घेताना सावधान

By admin | Updated: December 10, 2015 02:02 IST

नैना क्षेत्रात आजही विनापरवाना बांधकामांचा धडाका सुरू आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. अशा गृहप्रकल्पांत घरे घेताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन सिडकोने नागरिकांना केले आहे

नवी मुंबई : नैना क्षेत्रात आजही विनापरवाना बांधकामांचा धडाका सुरू आहे. मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. अशा गृहप्रकल्पांत घरे घेताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन सिडकोने नागरिकांना केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी बांधकामांची वैधता तपासून पाहावी, असेही सिडकोच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.मुंबईपेक्षा दुप्पट क्षेत्रफळ असलेल्या नैना क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नेमणूक केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात कोणतेही बांधकाम करताना सिडकोची परवानगी घेणे अनिवार्य आहे. असे असले तरी कोणतीही परवानगी न घेता या क्षेत्रात बांधकामांचा धडाका सुरू आहे. परवानगी न घेता उभारण्यात येणारे सर्व गृहप्रकल्प अनधिकृत असून, त्यावर नियमाने कारवाई केली जाणार आहे. याचा फटका अशा प्रकल्पांत घरे घेणाऱ्या ग्राहकांना बसू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी जागेची मालकी व संबंधित प्राधिकरणाकडून मिळालेल्या परवानग्यांची शहानिशा करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, सिडकोने नैना क्षेत्रातील २३ गावांच्या विकासाचा एक पायलट प्रोजेक्ट तयार करून तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. विशेष म्हणजे हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सिडकोला तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. या काळात या क्षेत्रातील विकासकामे रखडली. भूमाफियांनी याचा फायदा घेत मोठमोठे अनधिकृत गृहप्रकल्प उभारले आहेत. आजही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत.