शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

By admin | Updated: November 17, 2016 06:16 IST

आयुक्तांवर दाखल केलेल्या अविश्वास ठरावाविषयी एक महिन्यामध्ये स्पष्टीकरण देण्याच्या सूचना शासनाने महापौरांना दिल्या होत्या.

नवी मुंबई : आयुक्तांवर दाखल केलेल्या अविश्वास ठरावाविषयी एक महिन्यामध्ये स्पष्टीकरण देण्याच्या सूचना शासनाने महापौरांना दिल्या होत्या. याप्रमाणे १३७ पानांचा सविस्तर अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. यामध्ये आयुक्तांनी दिलेल्या पत्रातील मुद्देही खोडण्यात आले असून पत्रात उल्लेख केलेले अनियमिततेचे मुद्दे व अविश्वास ठराव यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापौर सुधाकर सोनावणे यांनी शासनाला दिलेल्या अहवालाविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये कोणते मुद्दे मांडले आहेत याविषयी माहिती दिली. आयुक्तांनी अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी शासनाकडे पत्र पाठवून महापालिकेमधील अनियमिततेकडे लक्ष वेधले होते. मालमत्ता कर विभागातील ९४८ कोटी रूपयांची अनियमितता. फ्लोटिंग अ‍ॅडव्हान्स कॅज्युअ‍ॅल्टी कॉम्प्लेक्स रूग्णवाहिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल आच्छादन बसविणे, मोरबे धरणावरील सौर ऊर्जा प्रकल्प, मोरबे धरण पाणीपुरवठ्यासाठी स्काडा पद्धती, जेएनएनयूआरएमअंतर्गत पाणी वापराचे नियोजन व मीटर बसविणे, शैक्षणिक साहित्य खरेदी, बाह्य यंत्रणेद्वारे साफसफाईची कामे याविषयी आयुक्तांनी शासनाकडे तक्रार केली होती. या सर्व कामांमध्ये अनियमितता झाली असून यामधील अनेक निर्णय रद्द केल्यामुळे पालिकेचे पैसे वाचल्याचा दावा केला होता. महापौरांनी शासनाला दिलेल्या अहवालामध्ये हे मुद्दे खोडून काढले आहेत. अविश्वास ठराव व कामकाजामधील अनियमितता यामध्ये काहीही संबंध नाही. आयुक्त अविश्वास ठरावानंतर अनियमिततेकडे लक्ष देवून शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. आयुक्तांच्या सर्व आक्षेपांना स्पष्टीकरण देण्यात आले असून अविश्वास ठरावाची वेळ का आली याविषयी माहिती दिली आहे. आयुक्तांनी सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरवात केली आहे. महापौर व नगरसेवकांशी संवाद ठेवण्यामध्ये अपयश आले आहे. पाच महिन्यांमध्ये महापालिकेची प्रतिमा मलिन झाली असून ती सावरण्यासाठी त्यांच्याकडून काहीही प्रयत्न झालेले नाहीत. आयुक्तांनी अतिक्रमणाच्या दिलेल्या नोटीसपैकी अनेकांना न्यायालयाची स्थगिती मिळाली आहे. त्यांनी केलेल्या फेरीवाला व इतर कारवायांचाही फारसा परिणाम झालेला नाही. स्वत: खूप चांगले काम करत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न असून त्यांच्या कार्यपद्धतीवर नगरसेवकांनी अविश्वास दाखविला आहे. १११ पैकी १०४ नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात मतदान केले आहे. लोकभावनेचा आदर करून त्यांची तत्काळ बदली करावी अशी मागणी महापौरांनी केली आहे. शासन सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वासही महापौर सोनावणे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)