शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचल भवनचे भूखंडवाटप रद्द

By admin | Updated: December 25, 2015 02:39 IST

अतिथीगृह व एम्पोरिअम उभारणीसाठी सिडकोने राज्याचे भवन उभारण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारला वाशी येथे दिलेल्या भूखंडाचे वाटप सिडकोने रद्द केले आहे.

कमलाकर कांबळे,  नवी मुंबईअतिथीगृह व एम्पोरिअम उभारणीसाठी सिडकोने राज्याचे भवन उभारण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारला वाशी येथे दिलेल्या भूखंडाचे वाटप सिडकोने रद्द केले आहे. भूखंडाचा गैरवापर करून सदर इमारतीचा कमर्शिअल वापर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सिडकोच्या परवानगीविना ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर त्रयस्त व्यक्तीला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिडकोने हा भूखंड रद्द करण्याची कारवाई केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सिडकोने वाशी सेक्टर-३० ए येथे विविध राज्यांना त्यांची अतिथीगृहे व एम्पोरिअमची उभारणी करण्यासाठी धोरण तयार केले आहे. त्यानुसार सिडकोने १ आॅगस्ट १९९७च्या करारानुसार अरुणाचल प्रदेश सरकारला त्यांच्या राज्याचे भवन उभारण्यासाठी वाशीच्या याच परिसरात २३३१ चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड वितरित केला आहे. अरुणाचल सरकारने या भूखंडावर अतिथीगृह अथवा एम्पोरियमची उभारणी न करता सिडकोच्या परवानगीशिवाय बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर एका बिल्डरला तो देऊन टाकला. त्यानंतर अरुणाचल प्रदेश भवनाच्या या इमारतीत कल्याण ज्वेलर्ससहित इमारतीच्या अन्य मजल्यांवर विविध बिल्डर्स व कंपन्यांनी वाणिज्यिक वापर सुरू केला. याबाबतची माहिती सिडकोला प्राप्त झाल्यानंतर सिडकोने २ मे २०१४ रोजी अरुणाचल प्रदेश शासनास कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागितला होता. सिडकोच्या नोटिसीला अरुणाचल प्रदेश सरकारने ३० जून २०१४ रोजी दिलेले उत्तर करारनाम्यातील अटी व शर्तींशी विसंगत आढळून आले. परिणामी, सिडकोने अरुणाचल सरकारवर कारवाई करण्याचे प्रस्तावित केले. परंतु सिडकोच्या भूखंडाचे भाडेपट्टाधारक असलेले अरुणाचल प्रदेश हे राज्य सरकार असल्याने त्यांच्यावर अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी काय कारवाई करावी याविषयी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.या प्रकरणी शासनस्तरावर वेळोवेळी चर्चा झाल्यानंतर सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी अरुणाचल भवनसाठी वाशी येथे दिलेल्या भूखंडाचे वाटप रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, तशी नोटीस अरुणाचल सरकारला बजावली आहे. ९० दिवसांच्या आत अरुणाचल प्रदेश सरकारने सदर भूखंड सिडकोच्या ताब्यात देण्याचे सूचित करण्यात आले आहे. भूखंडाचा ताबा सिडकोकडे न दिल्यास याविरोधात कारवाईच्या सूचना शहर व्यवस्थापकांना दिल्याचे व्ही. राधा यांनी स्पष्ट केले आहे.