शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

‘रिलायन्स फोर-जी’ला मंजुरी

By admin | Updated: December 30, 2014 01:36 IST

एकीकडे उत्पन्न ढासळलेले असतांना त्यात वाढ करण्याऐवजी पालिकेने स्वत:चे कोट्यावधींचे नुकसान केल्याची बाब ‘रिलायन्स फोर जी’ च्या निमित्ताने समोर आली आहे.

ठाणे : एकीकडे उत्पन्न ढासळलेले असतांना त्यात वाढ करण्याऐवजी पालिकेने स्वत:चे कोट्यावधींचे नुकसान केल्याची बाब ‘रिलायन्स फोर जी’ च्या निमित्ताने समोर आली आहे. विशेष म्हणजे या संदर्भातील प्रस्ताव पालिकेने महासभेत मंजुरीसाठी आणला होता. या प्रस्तावाला सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांसह विरोधी गटाचा पूर्णपणे विरोध होता. परंतु सोमवारी बारवाल्यांना देण्यात येणाऱ्या एनओसीच्या मुद्यावरून झालेल्या गदारोळात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मागील वर्षभरापासून ‘फोर जी’ साठी केबल टाकण्याचे काम रिलायन्सने सुरू केले आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासून यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिलायन्सच्या व्यवहारावर संशय निर्माण झालेला असतानाच माजी महापौर अशोक वैती यांनी रिलायन्सचे आणखी एक प्रकरण समोर आणले आहे. यापूर्वी रस्ता खोदण्यासाठी परवानगी देताना १ मी खोल खड्डा गृहीत धरून पैसे आकारले जात होते. मात्र रिलायन्ससाठी विशेष नियमाअंतर्गत ०.५ मीटर खोदण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप वैती यांनी केला. प्रत्येक प्रभाग समित्यांनी ०.५ मीटर खोदण्याची परवानगी देऊन दर आकारल्यास पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. इतर संस्था देखील भरलेले पैसे परत मागतिली अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. रस्ताफोडीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रस्ताव सोमवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी आला होता. यावर चर्चा करून प्रस्तावाला विरोध करायचा असे विरोधकांनी निश्चित केले होते. त्याला सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांचा देखील विरोध होता. परंतु बारवाल्यांना देण्यात येणाऱ्या एनओसीच्या मुद्यावरून झालेल्या गदारोळात हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी याची तीव्र नाराजी व्यक्त करीत महापौरांसह प्रशासनाचा निषेध केला. केबलसाठी टाकण्यासाठीचा रस्ताफोड फी दर सुधारीत करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वीच रिलायन्ससाठी ०.५ मीटर दराने शुल्क आकारण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.