शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेची पेणकरांना उत्सुकता

By admin | Updated: November 17, 2016 06:05 IST

पेण नगरविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पेणमध्ये प्रचारसभा घेणार आहेत.

पेण : पेण नगरविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पेणमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेकडे पेणच्या नागरिकांसह राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी पेणच्या जनतेला ग्रामीण भागासाठी एमएमआरडीएमधून पाणीपुरवठा योजनेसाठी ३० कोटींचा निधी दिला आहे. त्याचे हे दातृत्व पूर्वीच्या आघाडीच्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी पाळले नव्हते. यासाठी एक प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या होणाऱ्या प्रचार सभेत ते कोणता मास्टर स्ट्रोक मारतात याकडे राजकीय रणांगणावर विश्लेषक बारीक नजरा रोखून आहेत.पेण नगरी सांस्कृतिक कला, क्रीडा व विद्येचे माहेरघर, कोकणचे पुणे व श्री गणेशाच्या निर्मात्यांची कलानगरी, मुंबईच्या हाकेवरचे शहर. या नगरीचा कायापालट होण्यासाठी भविष्यातील विकास आराखडा असल्याची ग्वाही रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी पेणच्या सभेत दिली. नगरविकास आघाडीमध्ये भाजपा १५ व शेकाप ५, राष्ट्रवादी १ अशा २१ जागांचे विभाजन होऊन नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपाचा आहे. त्यामुळे पेण शहराची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाचे २ आमदार, पालकमंत्री, शेकाप आमदार अशा स्टार प्रचारक मंडळींचा राबता पेणमध्ये आहे. सत्तास्थानी असलेल्या काँग्रेसची कोंडी करण्याची व्यूहरचना झाली असून सोशल मीडिया, प्रचार चौक सभांमधून चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांची २० नोव्हेंबरची सभा निवडणूक कौलमध्ये यूटर्न घेणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.