शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा वर्धापन दिन दिमाखात

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी नवी मुंबई महानगरपालिकेचा २४ व्या वर्धापन दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात नवी मुंबई महानगरपालिकेचे

नवी मुंबई : वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी नवी मुंबई महानगरपालिकेचा २४ व्या वर्धापन दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारीवर्गाकरिता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायन, नृत्य तसेच नाट्याविष्कारेनी उपस्थित सर्वच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले.महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण केली. देशाला स्वच्छतेचे कर्तव्य पार पाडण्याचे वचन देतो. आठवड्यातील किमान दोन तास आपल्या कार्यस्थळाच्या स्वच्छतेसाठी दिले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने आपले योगदान द्यावे, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागील वर्षभरातील उल्लेखनीय पुरस्कार, सन्मान, वैशिष्ट्यपूर्ण सुविधा, कामे यांचा आढावा घेतला. मागील वर्षात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई महानगरपालिकेस लाभलेले तृतीय मानांकन, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राज्यातील १० व देशातील ९८ शहरांमध्ये झालेली निवड, एनएमएमटी उपक्र माला दोन राष्ट्रीय प्रोडक्टव्हिटी पुरस्कार मिळाले आहेत.घनकचरा व्यवस्थापन प्रणालीस राष्ट्रीय पुरस्कार, महापालिका मुख्यालय वास्तूस ग्रीन बिल्डिंगचे सुवर्ण मानांकन, अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून यशस्वीरीत्या संपन्न झालेल्या महापालिका निवडणूक प्रणालीची राज्य निवडणूक आयोगाकडून प्रशंसा करण्यात आली आहे. मलेरिया-डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिका करीत असलेली कार्यवाही उत्तम असून, या प्रणालीचा कृती आराखडा देशभरात राबविण्याबाबत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या राष्ट्रीय सहसंचालकांकडून लाभलेली प्रशस्ती, भूतान देशाच्या तसेच देशभरातील महालेखाकारांच्या राष्ट्रीय अभ्यास समूहाने महापालिका प्रकल्पांची केलेली प्रशंसा अशा वर्षभरातील विविध उल्लेखनीय बाबींचा विशेष उल्लेख करीत यापुढील काळातही ही प्रगतिशील वाटचाल अशीच सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेता जयवंत सुतार, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, विद्यार्थी युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे आणि इतर मान्यवर नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.