शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील समस्यांचा लेखाजोखा

By admin | Updated: August 26, 2015 23:06 IST

पनवेल शहरामधील समस्या, स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावर चारही बाजूंनी टीका सुरू आहे. नुकताच शहरातील ५0 संस्थांनी

पनवेल : पनवेल शहरामधील समस्या, स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावर चारही बाजूंनी टीका सुरू आहे. नुकताच शहरातील ५0 संस्थांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढत नगरपरिषदेचा निषेध केला होता. शहरातील समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला असून बुधवारी नगराध्यक्षा चारु शीला घरत व मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी शहरामधील समस्यांची पाहणी केली. नगरपरिषदेच्या कामकाजावर शहरामधील नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न नगरपरिषदेला सोडविता आलेले नाहीत. शहरामधील समस्या दूर करण्याच्या दृष्टीने व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी या पाहणी दौऱ्याचे आयोजन केल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली. यावेळी शहरामधील शिवाजी चौक परिसर, भाजी मार्केट, मच्छीमार्केट, कोळीवाडा, टपाल नाका परिसर, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदींची पाहणी केली. शहरामधील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुरवस्थेबाबत लोकमतने वृत्त प्रसिध्द केले होते. याचीही यावेळी दखल घेण्यात आली. या पाहणी दौऱ्यामध्ये नगराध्यक्षा चारुशीला घरत, गटनेते अनिल भगत, नगरसेवक राजू सोनी आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शहरामधील अतिक्र मण दिवसेंदिवस वाढत आहे. हा गंभीर प्रश्न असून नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणार आहे.- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल