शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

महत्त्वाकांक्षी प्रकल्प कागदावरच

By admin | Updated: February 20, 2017 06:46 IST

महापालिकेच्या २०१६ - १७ च्या अर्थसंकल्पातील एकही महत्त्वाकांक्षी योजना वर्षभरामध्ये सुरू होवू शकली नाही. नगरसेवकांनी

नामदेव मोरे / नवी मुंबईमहापालिकेच्या २०१६ - १७ च्या अर्थसंकल्पातील एकही महत्त्वाकांक्षी योजना वर्षभरामध्ये सुरू होवू शकली नाही. नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांना कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर देण्यातही प्रशासनाला अपयश आले असून आरोग्य सेवा डबघाईला आली आहे. प्रशासनाने पूर्ण लक्ष फक्त स्वच्छ भारत अभियानावर केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले असून २२९५ कोटींच्या अर्थसंकल्पाचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवी मुंबई महापालिकेचा २०१७ - १८ वर्षासाठी २९९९ कोटी व मागील वर्षाचा २२९५ कोटी रूपयांचा सुधारित अर्थसंकल्प आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केला. २२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्पातील उद्दिष्ट साध्य करण्यात यश आले आहे. विक्रमी महसूल जमा करण्यात आला ही सकारात्मक व अभिनंदनीय गोष्ट असली तरी वर्षभरामध्ये अर्थसंकल्पातील एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. १११ नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांना प्रशासनाने बगल देण्याचे काम केले आहे. याविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांनी वारंवार सभागृहात आवाज उठविला आहे. वर्षभरामध्ये सर्वाधिक दुर्लक्ष शिक्षण विभागाकडे झाले. पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ३० हजार विद्यार्थ्यांना गणवेश व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. संगणक व आॅडिओ व्हिजुअल शिक्षण बंद झाले आहे. ठोक मानधनावरील शिक्षकांना विनावेतन काम करावे लागत आहे. अंगणवाडीमधील मुलांनाही कोणतेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाचा वर्षभरामध्ये अक्षरश: खेळखंडोबा झाला आहे. तुर्भे व कोपरखैरणे माता बाल रूग्णालये बंद झाली आहेत. सीबीडी, नेरूळ व ऐरोलीतील नवीन रूग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेली नाही. वाशी प्रथम संदर्भ रूग्णालयातील एनआयसीयू युनिट बंद असून ते सुरू करण्यात अपयश आले आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शहरामध्ये संग्रहालय सुरू करणे, गवळीदेव पर्यटन केंद्र विकसित करणे, मोरबे धरण परिसरामध्ये सुशोभीकरण करण्याबरोबर जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये नाट्यगृह उभारण्याचे काम पूर्ण करण्यात येत होते. खाडी किनाऱ्यांचे सुशोभीकरण करण्याबरोबर अनेक ठिकाणी पादचारी व भुयारी मार्गांचीही तरतूद होती. पण प्रत्यक्षामध्ये यामधील एकही प्रकल्प सुरू होवू शकला नाही. महापालिका प्रशासनाने वर्षभरातील पूर्ण लक्ष स्वच्छ भारत अभियानावर केंद्रित केले होते. केंद्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविण्यासाठी आवश्यक तीच कामे करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. यामध्ये प्रसाधनगृहांची निर्मिती, दुरूस्ती व इतर कामांचा समावेश होता. या व्यतिरिक्त इतर समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. स्थायी समितीसह महासभेत पडसाद आयुक्तांनी पालिकेच्या महसुलामध्ये वाढ केल्याबद्दल त्यांचे स्वागत होत आहे. पण शहराच्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी वर्षभरामध्ये एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झालेला नाही. शिक्षण, आरोग्य व इतर अनेक विभागांसाठी तरतूद करून निधी खर्च आलेला नाही. नगरसेवकांनी सुचविलेली कामे झालेली नाहीत. या सर्वांचे पडसाद स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेमध्ये पडण्याची शक्यता आहे. पैसे असून व नागरिकांची गैरसोय होत असून न केलेल्या खर्चाचा जाब प्रशासनास विचारून कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.लोकप्रतिनिधींचा उपयोग काय? आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्पावर स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होत असते. सखोल चर्चेनंतर नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा व शहर हितासाठी महत्त्वाच्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला जातो. अर्थसंकल्पातील कामे वर्षभर करणे आवश्यक असते. सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होत नसले तरी काही ना काही प्रकल्प प्रत्येक वर्षी सुरू होत असतो. पण गतवर्षभरामध्ये यामधील काहीच झाले नसल्याने अर्थसंकल्पावर लोकप्रतिनिधींनी केलेल्या चर्चेचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकप्रतिनिधींचा उपयोग काय? आयुक्तांनी सादर केलेला अर्थसंकल्पावर स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होत असते. सखोल चर्चेनंतर नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा व शहर हितासाठी महत्त्वाच्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला जातो. अर्थसंकल्पातील कामे वर्षभर करणे आवश्यक असते. सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होत नसले तरी काही ना काही प्रकल्प प्रत्येक वर्षी सुरू होत असतो. पण गतवर्षभरामध्ये यामधील काहीच झाले नसल्याने अर्थसंकल्पावर लोकप्रतिनिधींनी केलेल्या चर्चेचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कागदावर राहिलेल्या महत्त्वाकांक्षी योजना पशुवैद्यकीय दवाखाना व श्वान नियंत्रण केंद्र शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे महापुरूषांची स्मारके उभारणे शहरामध्ये वस्तू संग्रहालय उभे करणे घणसोलीमध्ये सेंट्रल पार्कची उभारणी करणे गवळीदेव निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करणे वाशीमध्ये जलतरण तलाव उभारणे मोरबे धरण परिसरात जलविद्युत प्रकल्प उभारणे मोरबे धरण परिसरामध्ये पर्यटन स्थळ विकसित करणे ऐरोली, नेरूळ, सीबीडी रूग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करणे ऐरोली नाट्यगृहाचे काम पूर्ण करणे ऐरोली व बेलापूर मतदार संघात दोन ईटीसी उपकेंद्र सुरू करणे शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणेप्रत्येक गावठाणाच्या बाहेर स्वागत कमानी बांधणेडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम पूर्ण करणेप्रशासकीय कारभाराचे स्वरूप महापालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे होत नाहीत. लोकप्रतिनिधींच्या सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवली जात आहे.  ८ महिने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पूर्णपणे प्रशासनावर पकड मिळविली आहे. अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नसल्याचे चित्र असून असाच कारभार करायचा असेल तर शासनाने प्रशासकीय राजवट लागू करावी असे मत नगरसेवक व्यक्त करू लागले आहेत.