शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी पर्यटकांची पोलिसांनाही धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:08 IST

देहरंग धरण परिसरामध्ये मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांनी पोलीस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. वरिष्ठ पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देहरंग धरण परिसरामध्ये मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांनी पोलीस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसलेल्या कारची काच फोडून एक व्यक्तीला जखमीही केले असून याप्रकरणी नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये संतोष डोंगरे, कर्णा तरे, अजिंक्य साळवे, भरत पाटील, अशोक जगदाळे, मुकेश पाटील, आकाश गजरे, रामनंद जयस्वाल, रूपेश भंडारे, नरेश पाटील, विष्णू पाटील, रोहन शिंदे, रूपेश दिघोडकर, शशिकांत खळे, दिनेश डोंगरे, संदीप गायकवाड, बाळू जोगदंड, मिलिंद कारंडे व इतर अजून एकाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शैलेश ठाकूर यांनी तक्रार दिली आहे. ठाकूर यांची देहरंग धरण परिसरामध्ये बंदोबस्तासाठी नियुक्ती केली होती. पनवेल धोदाणी डांबरी रोडवर काही पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना समजावूनही त्यांनी ऐकले नाही. तेथे पाहणी करण्यासाठी ुआलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे बसलेल्या इनोव्हा कारची काच फोडली. संतोष उत्तम डोंगरे या तरूणाने हाताबुक्क्यांनी काच फोडली. यावेळी तरूणाच्या हातालाही दुखापत झाली होती. पर्यटक ऐकत नसल्याने व गोंधळ घालत असल्याने फोन करून जादा बंदोबस्त मागविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून दंगेखोरांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गोंधळ घालणाऱ्यांविरोधात नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.