Air travel: new rules for each state; Take off from major cities | विमान प्रवास : प्रत्येक राज्यांचे नवे नियम; प्रमुख शहरांतून टेक ऑफ

विमान प्रवास : प्रत्येक राज्यांचे नवे नियम; प्रमुख शहरांतून टेक ऑफ

- एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली. परंतु, राज्यांनी या प्रवाशांसाठी क्वारंटाईनच्या बनवलेल्या नियमांची माहिती प्रवाशांना नव्हती. दिल्ली, चंढीगड आणि बिहारने क्वारंटाइनचे कोणतेच नियम केले नाहीत. त्यामुळे पाटणा विमानतळावर आलेल्या प्रवाशांच्या हातावर आधी क्वारंटाईनचा शिक्का मारला गेला. नंतर ते थांबवले गेले. यामुळे प्रवासी संभ्रमात आहेत की आम्हाला क्वारंटाईन व्हावे लागेल की नाही?

पश्चिम बंगालमध्ये विमानसेवा २८ मेनंतर सुरू होईल. तेथे प्रशासनाने क्वारंटाइनबद्दल कोणतेही नियम तयार केलेले नाहीत. केंद्र सरकारने आपल्या निर्देशांत म्हटले आहे की, १४ दिवसांचे क्वारंटाईन विशेष परिस्थितीत म्हणजे आरोग्याची तक्रार असलेला, गर्भवती महिला, गंभीर आजार व दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसोबत प्रवास करणाऱ्या पालकांनाच होम क्वारंटाइन सांगितले जाईल. याशिवाय विमान प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणे अनिवार्य केले गेले आहे.

केंद्र सरकारने आपली गाईडलाईन जारी करून राज्यांना स्वतंत्र एन्ट्री प्रोटोकॉल बनवण्याची परवानगी दिली. त्याअंतर्गत राज्यांनी आपापले क्वारंटाइन नियम बनवले. सोमवारी पहिल्या दिवशी विमानतळावर उतरल्यावर प्रवाशांना स्क्रिनिंगसह प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ््या नियमांमुळे त्रास झाला.

सॉलिसिटर जनरल काय म्हणाले?

एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असे निदर्शनास आणले की, एअर इंडियाने कोणत्या देशात किती भारतीय अडकले आहेत, हे लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी विशेष विमाने चालविण्याची व्यापक योजना आखली आहे. या विमानांची १६ जूनपर्यंतची पूर्ण तिकीट विक्रीही झाली आहे. ही तिकीट विक्री विमानातील सर्व आसनांसाठी केली गेली आहे.

आता ऐनवेळी मधली आसने रिकामे ठेवायचे झाल्यास विमानात ३३ टक्के कमी प्रवासी बसतील व ठरलेले सर्व वेळापत्रक कोलमडून पडेल. शिवाय एकत्र प्रवास करणारे कुटुंब शक्यतो सलग व शेजारची आसने घेत असल्याने मधली आसने रिकामी ठेवायचे झाल्यास कुटुंबातील काही जणांना प्रवास करता येणार नाही. त्यामुळे गेले दोन महिने अडचणीत दिवस काढलेल्या अशा कुटुंबांची ताटातूट होईल.

महाराष्ट्र : मुंबई विमानतळावर प्रवाशांना स्क्रिनिंगनंतर
14 दिवसांच्या होम क्वारंटाइनचा शिक्का मारून पाठवले.

गुजरात : गुजरात सरकारने प्रवाशांवर आयसोलेशनसाठी दवाब न आणण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने प्रवाशांना
14 दिवसांसाठी संस्थात्मक सुविधा किंवा घरी क्वारंटाइन करण्याचे आवाहन केले.

कर्नाटक : कर्नाटकात महाराष्ट्र, गुजरात, तमिलनाडू, दिल्ली, राजस्थान आणि मध्यप्रदेशातून येणाºया प्रवाशांना
07 दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाईन आणि ७ दिवसांच्या होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. इतर राज्यांतून येणाऱ्यांना १४ दिवसांचे होम क्वारटाईन असेल. याशिवाय येथे गर्भवती महिला, १० वर्षांपर्यंतची मुले आणि ८० वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ आणि आजारी लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन नसेल.

उत्तर प्रदेश :
उत्तर प्रदेशात येणाºयांना 14 दिवसांचे होम क्वारंटाइन आहे. जे प्रवासी बिझनेस व्हिजिटवर येत आहेत त्यांना या नियमाबाहेर ठेवले गेले आहे. त्यांना मुक्कामाच्या जागेचा तपशील द्यावा लागेल.

गोवा : गोव्यात विना कोविड-१९निगेटिव्ह सर्टिफिकेट असलेल्या प्रवाशांना आधी 2,000 रुपयांची चाचणी करावी लागेल. यानंतर अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन राहावे लागेल. ते जर पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना रुग्णालयात राहावे लागेल. जे चाचणीचा खर्च करू शकणार नाहीत त्यांना १४ दिवसांच्या घरी विलगीकरणात राहावे लागेल.

जम्मू-काश्मीर : जम्मू-कश्मीरमध्ये बाहेरून येणाºया प्रवाशांसाठी 04 दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन व्हावे लागेल.

ओदिशा : ओदिशात प्रोफेशनल्स, सरकारी अधिकारी आणि व्यावसायिक 72 तासांत परत येत असतील तर क्वारंटाइनमधून त्यांना सूट आहे.

पंजाब : पंजाबमध्ये १४ दिवसांचे होम आयसोलेशन व हिमाचल प्रदेशमध्ये 14 दिवसांच्या संस्थात्मक क्वारंटाईनचा आदेश आहे.

आसाम : आसाममध्ये ७ दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन आणि सात दिवसांपर्यंत होम आयसोलेशनचा नियम आहे.

छत्तीसगड : छत्तीसगढमध्ये येणाºयांना १४ दिवस हॉटेल किंवा सरकारी केंद्रात किंवा घरी आयसोलेट व्हावे लागेल.

Web Title:  Air travel: new rules for each state; Take off from major cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.