'मर्दासारखे वागा, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका'; मंदा म्हात्रे यांचा नाव न घेता गणेश नाईकांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 05:46 IST2026-02-25T05:45:10+5:302026-02-25T05:46:23+5:30

'तुम्हाला २५ वर्षात काही जमलं नाही. त्यामुळं असा विरोध करीत आहात का?, असा सवाल आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना केला. 

'Act like a man, don't put a gun on anyone's shoulder'; Manda Mhatre attacks Ganesh Naik without naming him | 'मर्दासारखे वागा, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका'; मंदा म्हात्रे यांचा नाव न घेता गणेश नाईकांवर हल्ला

'मर्दासारखे वागा, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका'; मंदा म्हात्रे यांचा नाव न घेता गणेश नाईकांवर हल्ला

नवी मुंबई : बेलापूर येथील मैदानावरील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय व मेडिकल कॉलेजसाठी
दुसरी जागा निवडावी, असा प्रस्ताव गावातील १४ नगरसेवक भरत भोईर यांच्या माध्यमातून महासभेत आला होता. त्यावर बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. यावेळी त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना लक्ष्य करून त्यांचे नाव न घेता "मर्द असाल तर मर्दासारखे वागा, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका," असा थेट इशारा दिला.

म्हात्रे म्हणाल्या की, रुग्णालयासाठी आवश्यक परवानग्या मिळवून भूखंडही निश्चित केला. मात्र, हे काम महिलेच्या पुढाकारातून होत असल्याने अडथळे निर्माण केले जात आहे. विरोध झाला नसता तर आज अर्धे रुग्णालय उभे राहिले असते. तसेच आठ एकरच्या या भूखंडाचा पूर्वी व्यावसायिक वापर सुरू होता आणि मैदान भाड्याने दिले जात होते. २५ वर्षे काहीच करू न शकलेले लोक आज विकासाला विरोध करीत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

अनधिकृत बांधकामे लक्षवेधी घेऊन बाहेर काढेन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेतली आहे. एक महिला रुग्णालयासाठी प्रयत्न करते आणि हे लोक विरोध करीत असल्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, त्यांनी आयुक्तांना आदेशित केल्याचे त्यांनी सांगितले. २५ वर्षात तुम्हाला हे जमले नाही, त्याची पोटदुखी आहे का? असेल तर या, मी तुम्हाला अॅडमिट करते. आता पैसे मिळायचे बंद झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. मी आजवर दोन वेळा धक्का दिला आहे आणि परत देईन, माझ्या नादाला लागू नका, असे सांगून कोणाची किती अनधिकृत बांधकामे आहेत, हे लक्षवेधी घेऊन बाहेर काढेन, असा इशाराही त्यांनी दिला.

कंत्राटात हवी टक्केवारी

तुम्हाला २५ वर्षात काही जमलं नाही. त्यामुळं असा विरोध करीत आहात का, असा सवाल करून तुम्ही पालिकेचे हॉस्पिटल बांधून ते फोर्टिजला विकले, असा आरोपदेखील त्यांनी केला. 

वाशी प्लाझा कसा उभा राहिला? त्यामध्ये दुकाने, स्पा कोणाची आहेत? गटारे, नाल्यावर इमारती कशा उभ्या राहिल्या? असे प्रश्न करून नगरसेवकांना भाजपने तिकीट पक्षाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी दिलेली नसल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. त्यांना या रुग्णालयाच्या कंत्राटांमधूनही टक्केवारीची अपेक्षा असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title : मंदा म्हात्रे का गणेश नाईक पर हमला, कहा 'मर्द की तरह व्यवहार करो'

Web Summary : मंदा म्हात्रे ने बेलापुर अस्पताल परियोजना के विरोध की आलोचना की और गणेश नाईक पर एक महिला के नेतृत्व वाली प्रगति को बाधित करने का आरोप लगाया। उन्होंने अनाधिकृत निर्माणों को उजागर करने और अनुबंध प्रतिशत की मांगों का आरोप लगाया, अतीत के सौदों का हवाला दिया।

Web Title : Manda Mhatre attacks Ganesh Naik, says 'Act like a man'

Web Summary : Manda Mhatre criticized opposition to a Belapur hospital project, accusing Ganesh Naik of obstructing progress led by a woman. She warned of exposing unauthorized constructions and alleged demands for contract percentages, referencing past deals.