शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
5
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
6
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
7
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
8
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
9
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
10
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
11
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
18
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
19
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
20
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
Daily Top 2Weekly Top 5

निविदा प्रक्रियेत 4क् टक्के भ्रष्टाचार

By admin | Updated: December 6, 2014 22:30 IST

जलवाहिन्या आणि भुयारी गटारांची पुनर्रचना करून नवीन वाहिन्या टाकण्याच्या प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावांवर शनिवारी स्थायी समितीत वादळी चर्चा झाली.

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात सद्यस्थितीत सुरू असलेल्या रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटीकरणाच्या कामांमध्ये बाधीत होणा:या जलवाहिन्या आणि भुयारी गटारांची पुनर्रचना करून नवीन वाहिन्या टाकण्याच्या  प्रशासनाने दाखल केलेल्या 
प्रस्तावांवर शनिवारी स्थायी समितीत वादळी चर्चा झाली. ठराविक कंत्रटदारांनाच कामे दिली जात असल्याकडे लक्ष वेधताना निविदा प्रक्रियेत अधिका:यांकडुन 4क् टकके भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केल्याने प्रशासनाची कार्यपध्दती संशयाच्या फे:यात सापडली आहे. जलवाहीनी आणि भुयारी गटारांच्या कामांचे तब्बल 12 कोटी रूपयांचे प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केले होते. यापैकी 2 कोटी 13 लाख 63 हजार 297 रूपयांच्या गटार वाहिन्या टाकण्याचे काम मे.एस.बी.खकाळ यांना तर जलवाहिन्या टाकण्याची 1क् कोटी 12 लाख 86 हजार 88 रूपयांची 6 कामे मे. एस. एस. अभ्यंकर यांना देण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले होते. हे प्रस्ताव चर्चेला येताच स्थायीचे सदस्य बाळ हरदास यांनी ठराविक कंत्रटदारालाच कामे मिळण्यासाठी प्रशासन प्रय} करीत असून यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. या आरोपावरून सदस्य वामन म्हात्रे, मनोज घरत, रमेश म्हात्रे यांनीही  प्रशासनाला फैलावर घेतले. निविदा प्रचिलित दरापेक्षा वाढीव 7 ते 16 टकके दराने कशा आल्या? असा सवाल ही केला़ तीनदा निविदा काढून प्रतिसाद मिळत नाही, काही ठराविक कंत्रटदारांना कामे मिळण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार अटीशर्ती बनविल्या जातात, या अटी जाचक ठरत असल्याने अन्य कंत्रटदारांकडून निविदांना प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप सदस्यांनी केला़ एकाच ठेकेदाराला 6 कामे दिली जात असताना त्याच्याकडे ही कामे करण्याइतपत मनुष्यबळ आहे का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. 
भ्रष्टाचाराच्या या आरोपांचे प्रशासनाने खंडन केले. दोनदा निविदा मागविण्यात आल्या होत्या़ परंतु,  प्रतिसाद न मिळाल्याने तिस:यांदा एकमेव निविदा प्राप्त झाल्याने संबंधितांना कामे दिल्याचे स्पष्टीकरण शहर अभियंता पी. के. उगले यांनी दिले. अखेर ही कामे तातडीने करावयाची असल्याने याला मंजूरी देताना सदस्यांनी वाढीव दराच्या निविदा प्रकरणी भविष्यात काही कायदेशीर कारवाई झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करून बचावात्मक भूमिका घेतल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)
 
‘ त्या ’ कंत्रटदाराला जलवाहिनीची कामे 
डोंबिवली येथील तरणतलावाच्या दुरवस्थेप्रकरणी संबंधित कंत्रटदार एस.एस.अभ्यंकर यांची अनामत रककम जप्त करून तलाव ताब्यात घ्या असे आदेश 31 जानेवारी 2क्14 च्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आले होते. तत्कालीन समितीचे सदस्य तथा विद्यमान सभापती दीपेश म्हात्रे यांनीच दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. याच कंत्रटदाराला सभापती म्हात्रेंच्या समितीने आता जलवाहिन्या टाकण्याची 1क् कोटी 2क् लाखांची कामे दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.