शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनप्रकरणी दहा जणांना अटक

By admin | Updated: February 21, 2017 06:11 IST

नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेत सोमवारी सकाळी मुलांना शाळेत पाठवू नका

पनवेल : नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेत सोमवारी सकाळी मुलांना शाळेत पाठवू नका, अशी विनंती करून काही जणांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून अडवले. त्यामुळे काही परिसरात तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून अडवणाऱ्या १० पालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. व त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आता राजकीय हस्तक्षेप होऊ लागल्याने निर्णयास विलंब होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेच्या प्रशासनाविरुद्ध राजेंद्र निंबाळकर, मनीषा पाटील, भारत जाधव, राजश्री निंबाळकर, राजेंद्र सालियन व अतुल पवार या पालकांचे उपोषण ५व्या दिवशीही सुरूच आहे. रविवारपासून त्यामध्ये अभविपचे तेजस जाधव व मयूरेश नेतेकर सहभागी झाले आहेत. शाळा प्रशासनाकडून पालकांनी केलेल्या मागण्यांपैकी एकही मागणी मंजूर करण्यात आलेली नाही. तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही टाळाटाळ करीत असल्याने पालकांनी सोमवारी सकाळी साडेसात वाजता शाळा बंद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिक्षक व पालकांमध्ये झटापट झाली. शाळेत उशीर होत असल्याने काही विद्यार्थ्यांनी भिंतीवरून उडी मारून शाळेत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी सारिका ढेपे, संध्या गायकवाड, स्नेहा साळवी, प्रतिभा सावंत, मिराज शेख, हर्षल पांडव, वैभव सुरवाडे, उत्तम सुर्वे, सोमेश्वर कोलगे व अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कराड यांना ताब्यात घेतले.मुख्याध्यापिका सईदा जावेद यांनी पालकांविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाणेत तक्रार केली. आ. प्रशांत ठाकूर, वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांचे सोबत चर्चा केली. आमदारांनी शिक्षण उपसंचालक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यावर शिक्षण शुल्क समितीची ८ मार्चला बैठक होईपर्यंत शाळेचा फी कक्ष बंद ठेवण्याचे आदेश देण्याचे उपसंचालकांनी मान्य केले. आमदारांनी या प्रकरणात लक्ष देण्याची जबाबदारी मनोज भुजबळ यांच्यावर सोपवली आहे. पालकांचे उपोषण शांतपणेसोमवारी सकाळी पालकांनी मुलांना शाळेत जाण्यापासून रोखले, त्यामुळे शाळेने पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. शाळेच्या प्रवेशद्वारावरून पालकांना ताब्यात घेऊन शाळेच्यातक्र ारीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. - जयराज छापरिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खांदेश्वर पोलीस ठाणे शाळा प्रशासनाने पालकांचे न्याय आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यासाठी विद्यार्थी, तसेच शिक्षकांना समोर करून खोट्या तक्र ारी दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. - मनोज भुजबळ