शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडांगणासाठी १० लाख

By admin | Updated: November 2, 2015 02:08 IST

विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात योग्य प्रावीण्य मिळावे यासाठी सुसज्ज क्रीडांगण होण्यासाठी कोलाड व सुतारवाडी येथील क्रीडांगणासाठी दहा लाख रुपयांचा निधी

पाली : विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात योग्य प्रावीण्य मिळावे यासाठी सुसज्ज क्रीडांगण होण्यासाठी कोलाड व सुतारवाडी येथील क्रीडांगणासाठी दहा लाख रुपयांचा निधी आ. सुनील तटकरे यांच्या आमदार फंडातून दिला जाईल अशी घोषणा आ. अनिल तटकरे यांनी केली. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सुतारवाडी येथील द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.आ. सुनील तटकरे म्हणाले, माझ्या रायगड जिल्ह्यात असलेल्या या संस्था शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या भौतिक सोयी-सुविधा कर्ज काढून पुरविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. यातील एक नंबरची सुधागड एज्युकेशन सोसायटी आहे आणि या संस्थेचे आम्ही सर्व भावंडे विद्यार्थी आहोत, याचा अभिमान मला आहे असे गौरवाद्गार त्यांनी काढले. यावेळी प्रास्ताविकात अध्यक्ष वसंत ओसवाल म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब लिमये व स्व. दत्ताजी तटकरे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधलेल्या इमारतीला ४६ वर्षे झाली. शिक्षणाचे काम सातत्याने सुरू रहावे या हेतूने व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण आणि भौतिक सोयी-सुविधा मिळणे आताच्या काळात गरजेचे असल्यामुळे दहा हजार पाचशे स्क्वे. फुटाची सुसज्ज इमारत संस्थेने आरडीसी बँकेकडून कर्जपुरवठा घेवून बांधकाम करण्याचे ठरवले. या इमारतीचे बांधकाम १५ मेपर्यंत पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नव्या इमारतीत बसायला मिळेल. अकरा तुकड्यांवरून आज चारशे अठरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पुढील काळात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न करणे जरुरीचे आहे, असे प्रतिपादन ओसवाल यांनी यावेळी केले. यावेळी आ. अवधूत तटकरे, राजिपचे शिक्षण सभापती भाई पाशिलकर, युवा नेते अनिकेत तटकरे, सुजाता गोपाळे, मेघा निळेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)