इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 17:11 IST2025-05-18T17:10:28+5:302025-05-18T17:11:37+5:30
Jyoti Malhotra YouTuber Pakistan Spy Connection: प्रवासाचा खर्च पाकिस्तानकडून, चीनमध्ये मिळत होती 'VIP ट्रिटमेंट'

इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
Jyoti Malhotra YouTuber Pakistan Spy Connection: 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे यूट्यूब चॅनल चालवणारी यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती ट्रॅव्हल ब्लॉग बनवायची. आता तिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिने स्वतः चौकशीदरम्यान कबूल केले की ती पाकिस्तानी हँडलरसाठी माहिती गोळा करत असे. यासाठी तिला खूप पैसे मिळाले. यासोबतच तिला अनेक देशांमध्ये प्रवास करण्याची संधीही मिळाली.
प्रवासाचा खर्च पाकिस्तानकडून, चीनमध्ये 'VIP ट्रिटमेंट'
ज्योती सुटी साजरी करण्यासाठी म्हणजेच 'व्हेकेशन'साठी परदेशात जायची. पण तिच्या प्रवासाचा खर्च तिला कधीच करावा लागला नाही. उलट पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तिच्या परदेश दौऱ्याचा खर्च केल्याचे समोर आले आहे. ज्योतीला केवळ पाकिस्तानला गेल्यावरच नव्हे, तर चीनला गेल्यावरही VIP वागणूक मिळाली. चौकशी दरम्यान तिने सांगितले की ती तीनदा पाकिस्तानला आणि एकदा चीनला गेली होती. याशिवाय तिने अनेक वेळा काश्मीरलाही भेट दिली.
इंडोनेशिया, थायलंडसह अनेक देशांत प्रवास
ज्योती पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत परदेश दौऱ्यावर जात असे. ज्योतीने इंडोनेशियाच नव्हे तर थायलंड, दुबई, भूतान, बांगलादेश आणि नेपाळ अशा अनेक ठिकाणी पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत प्रवास केला आहे. ती तिच्या यूट्यूब चॅनेलसाठी व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली परदेशात फिरत असे. ज्योती ही हरियाणातील हिसारची रहिवासी आहे, पण ती २०२३ मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानला गेली आणि तेव्हापासून तिने हेरगिरी सुरू केली.
----
ज्योती मल्होत्रा युट्यूबर म्हणूनच खूप प्रसिद्ध
ज्योती इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर खूप प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवरील तिच्या बहुतेक व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात. तिला इंस्टाग्रामवर १३८ हजार लोक फॉलो करतात. याशिवाय, तिचे YouTube वर 381K सबस्क्राइबर आहेत. ती वेगवेगळ्या देशांना भेटी देते आणि त्या देशांबद्दल ब्लॉग बनवते आणि ते YouTube वर अपलोड करते. सुरुवातीला तिने पोलिसांना असेही सांगितले होते की ती एक ब्लॉगर आहे आणि देशभर आणि परदेशात फिरून व्हिडिओ बनवते. पण पोलिसांनी तिचा खोटारडेपणाचा बुरखा फाडला आणि नंतर तिने स्वतः कबूल केले की ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होती. ज्योतीवर 'ऑपरेशन सिंदूर' आणि लष्कराशी संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवल्याचाही आहे.