Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:31 IST2025-05-22T10:30:07+5:302025-05-22T10:31:21+5:30
Jyoti Malhotra : ज्योती २०२४ मध्ये तीनदा आणि २०२३ मध्ये एकदा मुंबईत आली. प्रत्येक वेळी तिने मुंबईच्या विविध भागांचे फोटो काढले आणि व्हिडीओ बनवले होते.

Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्यामुंबई भेटीचीही आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपास यंत्रणांना असं आढळून आले आहे की, ज्योती चार वेळा मुंबईत आली होती. ज्योती २०२४ मध्ये तीनदा आणि २०२३ मध्ये एकदा मुंबईत आली. प्रत्येक वेळी तिने मुंबईच्या विविध भागांचे फोटो काढले आणि व्हिडीओ बनवले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती जुलै २०२४ मध्ये एका लक्झरी बसने मुंबईला पोहोचली आणि ऑगस्ट २०२४ मध्ये ती अहमदाबादहून कर्णावती एक्सप्रेसने मुंबईला आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ती पंजाब मेलने नवी दिल्लीहून मुंबईत आली. एवढंच नाही तर २०२३ मध्ये गणेशोत्सवादरम्यान तिने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. दर्शनाच्या बहाण्याने लाखोंची गर्दी आणि संपूर्ण परिसराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.
तपासात असं दिसून आलं की, ज्योतीने तिच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून अनेक व्हिडीओ आणि फोटो डिलीट केले होते, जे एका विशेष तंत्राचा वापर करून रिकव्हर करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ आणि फोटो ती नेमकी कोणाला पाठवत होती किंवा पाठवले गेले आहेत आणि त्यात कोणती संवेदनशील माहिती होती? याचा पोलीस आणि सुरक्षा संस्था बारकाईने तपास करत आहेत.
"पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
ज्योती मल्होत्राचेपाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित अली हसनसोबतचं आणखी एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे. यामध्ये ज्योती पाकिस्तानमध्ये लग्न करण्याबद्दल बोलत आहे. ज्योती मल्होत्राने स्वतः व्हॉट्सअॅप चॅटवर अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही, परंतु ज्योतीने सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याची अशी इच्छा व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. जर पाकिस्तानी युट्यूबर किंवा कोणत्याही लोकप्रिय व्यक्तीशी लग्न केलं तर सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स वाढतील. यामुळे तिच्या पोस्टला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळतील असं तिला वाटत होतं.