शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

पॅरडी अकाउंटवरून वादग्रस्त पोस्ट, यू-ट्युबर ध्रुव राठीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 17:32 IST

Dhruv Rathi News: परखड राजकीय विश्लेषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला प्रख्यात यूट्युबर ध्रुव राठी एका वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत आला आहे. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी त्याच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

परखड राजकीय विश्लेषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला प्रख्यात यूट्युबर ध्रुव राठी एका वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत आला आहे. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी त्याच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. एका फेक एक्स पोस्ट प्रकरणी ध्रुव राठीविरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता ज्या एक्स अकाउंटवरून हे ट्विट करण्यात आले आहे ते ध्रुव राठी याचेच आहे का? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होता. दरम्यान, ध्रुव राठीच्या नावाने ज्या अकाऊंटवरून ही  पोस्ट टाकण्यात आली होती. ते अकाऊंट ध्रुव राठीचं नसून त्याच्या नावाने तयार केलेलं पॅरोडी अकाऊंट होतं, अशी माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार ध्रुव राठाी याच्याविरोधात हा गुन्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी लिहिलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी दाखल करण्यात आली आहे. ओम बिर्ला यांची मुलगी परीक्षा न देताचा यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली, असा आरोप या पोस्टमधून करण्यात आला होता. 

या प्रकरणी ओम बिर्ला यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ध्रुव राठीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून अंजली बिर्ला यांच्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. तसेच अंजली बिर्ला ह्या परीक्षा न देताच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता, असा आरोप बिर्ला कुटुंबीयांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. 

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासामधून ज्या अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आलं. ते अकाऊंट ध्रुव राठीच्या नावाने काढण्यात आलेलं पॅरोडी अकाऊंट असल्याचं समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

या प्रकरणी ध्रुव राठी यांची प्रतिक्रिया समोर येऊ शकलेली नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ध्रुव राठी याने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्याने विविध मुद्द्यांवर केलेल्या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाom birlaओम बिर्लाMumbaiमुंबईcyber crimeसायबर क्राइम